महायुतीत मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम; सरकार स्थापनाची तारीख पुढं ढकलली, कधी होणार शपथविधी
Maharashtra CM Face : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती. मात्र, आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतयं. यामागे दोन ते तीन महत्त्वाची कारणं आहेत. (Maharashtra) सुत्रांच्या माहितीनुसार, पूर्ण बहुमताचं सरकार असल्यानं कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे, त्यानंतर अमित शाह आणि शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात बैठक होईल, आणि मग त्यानंतर या तिघा नेत्यांचा शपथविधी होईल असं कळतंय. त्यामुळे 27 किंवा 29 तारखेला सत्तास्थापन होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री, 28 नोव्हेंबरला घेणार शपथ
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर अर्थातच चर्चा सुरू झाली ती, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याची. 26 नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची मुदत संपतेय. त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं बंधनकारक आहे, नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र, ही धारणा चुकीची असल्याचं अनेक कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य
मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबईत शिंदेंच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी आमदारांनी केली आहे. यावर काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, तुमच्या चेहऱ्यामुळे महायुतीला फायदा झाला असून, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी केली आहे. तसंच, आता मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीचा तिढा वाढणार असल्याचं बोललं जात आहे.