महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? भाजप-शिंदे गट अन् पवारांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Goverment Mahayuti Formula : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Goverment) एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 137 जागांवर भाजपने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात आपलं सातत्या कायम ठेवलं आहे.
या निवडणुकीमध्ये भाजपनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या निवडणुकीत एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीचा दणक्यात पराभव झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे यंदा महायुतीचं (Mahayuti) सरकार पुन्हा स्थापन होणार आहे.
अखेर शरद पवारांचा गड ढासळला; पश्चिम महाराष्ट्रात मिळाल्या केवळ 7 जागा
विधानसभा निवडणुकीचा निकाल काल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर आता सर्वांना मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर महायुतीमध्ये चर्चा सुरु असल्याचं समोर येतंय. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नेमका कोण असेल, यावर मात्र अजून महायुतीच्या कोणत्याही नेत्याने स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. परंतु दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हेच सूत्र कायम असेल, एवढं मात्र नक्की आहे.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मतांच्या फुटीचा इम्तियाज जलील यांना फटका; अपक्षांची किती घेतली मत?
महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजे फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 अन् राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात हीच चर्चा सुरू आहे. प्राथमिक वाटाघाटी झाल्याचं देखील सांगण्यात येतंयय. आज तिन्ही घटक पक्षांचे मुख्य नेते आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर बदल होवू शकतो. परंतु सध्या हाच फॉर्म्युला विचाराधीन असल्याचं दिसतंय.
तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येवून बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. तो निर्णय पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना मान्य असेल, असं काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं आहे. लवकरच मुख्यमंत्रिपदाबाबत घोषणा करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे.