यशोमती ठाकूर यांचे हात बळकट, महाराष्ट्र युवक नाभिक महासंघाने दिला जाहीर पाठिंबा…
अमरावती : दोन दिवसांपूर्वी बहुजन महापार्टीचे उमेदवार खोब्रागडे यांनी तिवसा येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दिला होता. बहुजन महापार्टीनंतर आता महाराष्ट्र युवक नाभिक महासंघानेही (Maharashtra Nabhik Sanghatana) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना जाहीर पाठिंबा दिला. युवक नाभिक महासंघाने नुकतेच पाठिंब्याचे पत्र ठाकूर यांना दिले आहे. या पाठिंब्यामुळे आपली शक्ती वाढली असून सर्वच समाजाच्या प्रगतीसाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, असे अभिवचन यावेळी यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना दिले.
विरोधक षडयंत्र रचतील, दिशाभूलही करतील, त्यांचा डाव हाणून पांडा; यशोमती ठाकूर यांचे आवाहन
महाराष्ट्र युवक नाभिक महासंघाचा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती चंद्रकांतजी ठाकूर यांना जाहिर पाठींबा असल्याचे पत्र नुकतेच जारी करण्यात आले आहे. सदर पाठिंब्याचे पत्र यशोतमी ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना देण्यात आले. या पत्रामध्ये नाभिक समाजाने यशोमती ठाकूर यांनी केलेल्या सहकार्य आणि त्यांच्या दूरदृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महायुतीच्या काळात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, या सरकारला जागा दाखवून द्या; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज यांचे भव्यदिव्य समाज मंदिर बांधून नाभिक समाजावर फार मोठे उपकार करण्यात आले, तसेच अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखडे यांच्या निधीतून हुतात्मा भाऊ कोतवाल सभागृह (50 x 50 हॉल) कौंडण्यपूर येथील रिकाम्या जागेवर बांधून देण्याची ग्वाही देण्यात आली. संजय पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र युवक नाभिक महासंघ) यांना हे सभागृह बांधून देण्याबाबत शब्द दिला. त्या अनुषंगाने आपणास जाहिर पाठिंबा देण्यात येत असल्याचे पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, समाजातील सर्व स्तरातून यशोमती ठाकूर यांना समर्थन मिळत असल्याने त्यांची दावेदारी आता भक्कम झाली आहे. दिवसेंदिवस मिळत असलेल्या पाठिंबामुळे ठाकूर आता मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असं चित्र आहे.