Download App

दिल्लीतील महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी काय? अमित शाहांनी मागवलं रिपोर्ट कार्ड

Amit Shah Asked Report Card for Cabinet Minister : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra CM) लागून दहा दिवस उलटले, तरी मात्र अजून सरकार स्थापनेच्या हालचाली धिम्या गतीतच सुरू आहे. 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण? याची अधिकृत घोषणा अजून महायुतीच्या नेत्यांनी केलेली नाही. यासंदर्भात महायुतीचे नेते अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत बैठक (Mahayuti Delhi Meeting) पार पडली होती. या बैठकीची इनसाईड स्टोरी नेमकी काय आहे? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

दिल्लीत अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत अमित शाह (Amit Shah) यांनी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवलं. तसेच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीत परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं होतं का? याचा देखील विचार मंत्रिपद देताना केला जाणार आहे, अशी माहिती एबीपी माझ्याच्या हवाल्यानुसार मिळतेय.

राज्यात फडणवीसांच्या जागी वेगळं कुणी आणलं जातंय का? संजय राऊतांनी सांगितला आतला डाव

मंत्रिमंडळामध्ये इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळामध्ये मंत्रालयात कशा प्रकारे कामकाज केलं होतं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयामध्ये कामकाजासाठी किती वेळ देत होता? महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी संबंधित मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला? संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीमध्ये येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती का? या आमदारांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलंय का? या सगळ्या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. दरम्यान आज महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी; ‘या’ तारखेला पहिला प्रयोग

राज्यात संपूर्ण जनतेला उपमुख्यमंत्री कोण आणि किती असणार? याचा अजून निर्णय झालेला नाही. महायुतीची बैठक देखील लांबलेली आहे. सत्तास्थापनेआधी आता महायुतीची बैठक कधी होणार? याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. त्याचसोबत काल महायुतीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने आपापले गटनेते जाहीर केले आहेत. मात्र अजून भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा देखील रखडली आहे. या प्रश्नांच्या उत्तरांची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे.

 

follow us