Download App

ठाकरे, पवारांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण; आझाद मैदानावर जय्यत तयारी

Mahayuti Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray : मुंबईतील आझाद मैदानावर आज राज्यात नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना उपस्थित करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील निमंत्रित करण्यात आलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह प्रमुख नेते देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील.

आजच्या शपथविधी सोहळ्याला आता उद्धव ठाकरे, शरद पवार हे उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील 19 राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. राजशिष्टाचार विभागाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार, राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आलंय.

राज्यात नव्या सरकारचा आज ग्रॅंड शपथविधी सोहळा, देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रि‍पदाची शपथ

आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली. भव्य मंडप देखील उभारण्यात आलाय. या मंडपात 30 हजार नागरिक बसू शकणार आहेत. आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात आलंय. त्याच्या बाजूला देखील आणखी दोन स्टेज बांधण्यात आले आहेत. या मैदानावर एकूण तीन स्टेज उभारले गेले आहेत. या सशपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, आणि देशातील 19 राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहेत. राज्यातील बसस्टॉप, थिएटर तसेच सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे सोहळा लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत. उद्योगपती, बॉलिवूड-मराठी कलाकार यांना देखील निमंत्रित करण्यात आलंय. आझाद मैदानात 60 ते 70 हजार लोकांची उपस्थिती असण्याचा अंदाज आहे.

 

follow us