Mahayuti Press Conference Eknath Shinde On Budget session 2025 : विरोधकांनी महायुतीच्या (Mahayuti) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या आमदारांची संख्या कमी अन् कागदांची संख्या, अशी एकनाथ शिंदे यांनी टीका केलीय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे. सरकार नवं असलं तरी टीम जुनीच आहे. फक्त खुर्च्यांची अदलाबदल झालीय. यावेळी अजित पवार म्हणाले तुम्हाला फिक्स ठेवता आली (Mahayuti Press Conference ) नाही, त्याला मी काय करू? हा अर्थसंकल्प अजितदादा मांडतील, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. विरोधकांकडे आमदारांची संख्या कमी आणि कागदांची संख्या जास्त,अशी टीका केलीय. विरोधीपक्ष नेता होवू शकत नाही, असं जनतेने त्यांचं काम करून ठेवलंय.
रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे शिंदेंच्या आमदाराचे कार्यकर्ते, रोहिणी खडसेंचा दावा
विरोधी पक्षाने कामकाजात भाग घ्यावा. प्रश्न मांडावे, खऱ्या अर्थाने सरकारने निर्णय घेते, त्याला चांगलं म्हणण्याचं काम करावं. सभागृहात कमी आणि पायऱ्यांवर जास्त, असा विरोधी पक्षाचा आनंद आहे. राज्याला पुढे नेणं, हाच आमचा अजेंडा आहे. तोच अजितदादा तुमच्यासमोर मांडणार आहेत. अजितदादांना अर्थसंकल्प मांडण्याचा चांगला अनुभव आहे, असं देखील शिंदे म्हणालेत.
चहापानावर विरोधी पक्षांनी हट्ट कायम ठेवत बहिष्कार टाकला. सूड भावनेतून वागले आहेत, त्यांना तसंच उत्तर दिलं जाईल. तेच तेच रडगाणं गात बसण्यापेक्षा विकासाचं गाणं गावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. जनतेनं निकाल दिलाय. महायुतीत कोणताही कोल्ड वॉर नाही, सब थंडा थंडा कुल है, असं देखील ते म्हणालेत. खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी यावर जनतेने शिक्कामोर्तब केलंय. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकाच पक्षाची दोन चाकं असल्याचं देखील शिंदे म्हणालेय. आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाहीये, आमचा अजेंडा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, हा आहे.
पोलिसांचे हात बांधलेले, स्वार्थी सरकार…आकाच्या मांडीला मांडी लावून, आदित्य ठाकरे कोणावर बरसले?
आमच्याकडे कितीही सत्ता असली तरी आम्ही सुडबुद्धीने कारवाई करणार नाही. आमच्या तिघांचाही तो स्वभाव नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. काम करण्यात विरोधी पक्ष सोबत आला. काम केलं, तर त्यांचंही चांगलं होईल. महाराष्ट्राला नवं राजकारण पाहायला मिळेल, असं ते म्हणालेत. जागा कमी होत आहेत, आत्मपरिक्षण करावं, असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिलाय.