Download App

Lok Sabha Elections : महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, केवळ 6 जागांची बोलणी बाकी

  • Written By: Last Updated:

Lok Sabha Elections 2024 : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांच (Lok Sabha elections) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. भाजपने (BJP) राज्यात आपल्या वीस उमेदवारांची घोषणा केली. मात्र, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच आता महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर महायुतीच्य घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर आलं.

Tanush Kotian : 500 पेक्षा जास्त रन, 29 विकेट्स; टीम इंडियाला मिळाला आणखी एक ‘अश्विन’ 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप 25, शिंदे गट 11 आणि अजित पवार गट 6 जागांवर निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या कोणत्या जागा कोणी लढवायच्या यावरही या तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. आता केवळ सहा जागांवरच चर्चा सुरू आहे. ज्या सहा जागांची चर्चा आहे, त्यापैकी काही जागा मनसेला दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये दक्षिण मुंबईचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला मनसेचं बळ मिळाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अधिक फायदा होण्याचा अंदाज आहे. तसेच या युतीचा फायदा मनसेलाही होईल, असे दिसते.

Radhakrishan Vikhe : आता त्यांना भाजप उमेदवाराचा प्रचार करावाच लागणार; विखेंचा राम शिंदेंना टोला 

भाजप राज्यात एकूण 25 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने आतापर्यंत 20 जागांवर उमेदवार जाहीर केले असून केवळ पाच जागांवर उमेदवारांची घोषणा व्हायची आहे. उर्वरित जागा भाजप आपल्या समर्थकांना देणार असल्याचे वृत्त आहे. अमरावतीची जागा नवनीत राणा यांच्यासाठी सोडली जाणार आहे. ज्या सहा जागांवर अद्याप एकमत झालं नाही, त्यामध्ये दक्षिण मुंबईची आणि गडचिलोरीची जागा असल्याचे सांगण्यात येते. गडचिलोरी मतदारसंगातून राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम इच्छुक आहेत.

दरम्यान, राज्यातील महायुतीच्या जागावाटपावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यासाठी राज्याच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोन वेळा भेट घेतली. यानंतर मुंबईतील जागा वाटपावरही चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून एक-दोन दिवसांत त्याची घोषणा होईल, असे विधान अजित पवार यांनी नुकतेच केले होते.

जागावाटपावरून भुजबळ आक्रमक
तर काल भुजबळ हे जागावाटपावरून आक्रमक झालेत. आम्हाला चार सहा मिळणार आहेत, असं आम्ही ऐकलं नाही. अजित पवार गटाला एक आकडी जागा मिळतील, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. आम्ही दहा जागा मागितल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष तटकरेंनीही दहा जागांवर ठाम असल्याचं सांगितल्याचं भुजबळ म्हणाले.

follow us