Download App

माहिममध्ये नवा ट्विस्ट! सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज, पक्ष की अपक्ष?

माहिम विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला असून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरले की अफक्ष याबाबत अस्पष्टता आहे.

प्रशांत गोडेस: प्रतिनिधी, मुंबई

Sada Sarvankar News : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 नोव्हेंबरचा दिवस आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीम मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने माहीम विधानसभा मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे शिवसेनेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदासरवणकर यांनी आज माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे सरवणकरांकडून दोन उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले असून हे अर्ज पक्षाकडून भरण्यात आले आहेत की अपक्ष याबाबत अस्पष्टता आहे.

माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्याविरोधात मुलानेच खटला भरला; पक्षातील बंडखोरीवर पवार थेटच बोलले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलायं, तर शिवसेना (ठाकरे गटाकडून) महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गटाकडून) सदा सरवणकर यांनीही आज अर्ज दाखल केलायं. मनसेला पाठिंबा देण्यात यावा अशी अपेक्षा भाजपाची आहे, तर शिंदे शिवसेनेतील अनेक नेत्यांनी सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी याबाबत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

भावानेच फेटाळला अजितदादांचा दावा, श्रीनिवास पवार म्हणाले… आईला जसा दादा तसाच नातू युगेंद्र

मैत्रीपूर्ण लढत व्हावी…
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्यामुळं त्यांना महायुतीनं विजयी करावं. येथे महायुतीने कोणताही उमेदवार देऊ नये, असं शिवसेनासह भाजपा नेत्यांनी देखील म्हटलं होत. “राज ठाकरे यांचे आमच्याशी पारिवारिक संबंध आहेत आणि एक आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. म्हणून जर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडून निवडणूक लढवत असतील तर त्यांना आपण सर्वांनी मिळून विजयी का करू नये? अशी माझी इच्छा आहे. असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. मात्र माझा सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला विरोधी नाही. परंतु इथे मैत्रीपूर्ण लढत आणि महायुतीने अमित ठाकरेंना विजयी करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करेन असेही शेलार यांनी म्हटलं होतं” यानंतर दीपक केसरकर तसेच उदय सामंत यांनीही सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावं असं म्हटलं होतं. मात्र आपण उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम असून, तिथून निवडणूक लढवणारच असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.

दबावाला बळी पडणार नाही…
दुसरीकडे आज सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षाकडून त्यांची मनधरणी आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यावी यासाठी समजूत काढण्यात येते होती. मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सदा सरवणकर यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तसेच अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढली होती. परंतु पक्षातील कुणाचेही सदा सरवणकर यांनी ऐकले नाही. जरी माझ्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असला तरी मी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, असं सदा सरवणकरांनी म्हटलंय. त्यामुळं त्यांनी आज दोन अर्ज दाखल केलेत असंही बोललं जातंय. मात्र त्यांनी शिवसेना पक्षाकडून अर्ज दाखल केलाय की, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

follow us