Download App

माहिममध्ये ठाकरेंचा शिलेदार पुढे, अमित ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर

  • Written By: Last Updated:

Assembly Election Result 2024 Amit Thackerays Vs Sada Saravankar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यानुसार मुंबईत महायुती (Assembly Election Result 2024) आघाडीवर आहे, तर माहीममध्ये ठाकरेंचा शिलेदार महेश सावंत पुढे आहेत. तर राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिंदे गटाचे सदा सरवणकर पोस्टल पिछाडीवर पडले आहेत.

कोकणात महायुती की महाविकास आघाडी? विधानसभा निवडणुकीचा निकाल घ्या जाणून
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार आहे. राज्यात महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार,हे चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 20 नोव्हेंबर रोजी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांपैकी 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात मतदानाची टक्केावारी 66.05 आहे.

Assembly Election Result : उत्तर महाराष्ट्रात कोणाची बाजी? भुजबळ, विखे, अन् जगतापांची आघाडी…

 

follow us