Download App

सुंभ जळाला तरी पीळ कसा जाईल? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge On PM Modi : आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Mallikarjun Kharge On PM Modi : आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत दिले नाही मात्र तरीही ते पंतप्रधान झाले आहे तर त्यांनी आता जनतेसाठी काम करावा. मोदींकडून नेहमी आणीबाणीचा (Emergency) मुद्दा उपस्थित करण्यात येतो मात्र गेल्या 10 वर्षात त्यांनी देशात अघोषित आणीबाणी घोषित केली आहे.

पुढे ते म्हणाले, आज देशात पंतप्रधान NEET आणि इतर परीक्षांमधील ‘पेपर लीक’ सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतील अशी अपेक्षा होती मात्र आजही त्यांनी यावर भाष्य केले नाही. निवडणुकीत पराभवानंतरही त्यांचा अहंकार कायम आहे. ‘पंतप्रधान मोदींनी आज आपल्या औपचारिक भाषणात customary हे शब्द आवश्यकतेपेक्षा जास्त वापरले यालाच म्हणतात ‘रस्सी जल गई पण बल नहीं गया’ .

आज मोदीजी महत्वाच्या मुद्यांवर बोलणार अशी देशाला अपेक्षा होती मात्र त्यांनी NEET आणि इतर परीक्षांमधील ‘पेपर लीक’ प्रकरणात काहीच बोलले नाही पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले. गेल्या 13 महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसा होत आहे मात्र मोदीजी आतापर्यंत मणिपूरमध्ये गेले नाही तसेच आजच्या भाषणात देखील त्यांनी मणिपूरबद्दल काहीच बोलले नाही.

1 लाख रुपये वेतन, बंगला, कारसह ‘या’ सुविधांचा लाभ घेणार राज्यातील 33 खासदार

आसाम आणि ईशान्येतील पूरबद्दल एकही शब्द मोदीजी बोलले नाही. देशात वाढणाऱ्या महागाईबद्दल, रुपयांची होणारी घसरणबद्दल आणि एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळ्याबद्दल आज मोदीजी पूर्णपणे शांत होते मात्र आम्ही सभागृहात, रस्त्यावर जनतेचा आवाज उठवत राहू आणि संविधानाची रक्षा करू असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

‘पिपाणी’ विरोधात शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, म्हणाले, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाणार

follow us

वेब स्टोरीज