Download App

वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे टिकणारा पुतळा; सिंधुदूर्गात शिवरायांचा नवा पुतळा उभारला

वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टिकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणमध्ये स्पष्ट केलंय.

Cm Devendra Fadanvis : वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati shivaji Maharaj) हा पुतळा टिकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिवप्रेमींकडून संताप उसळला होता. त्यानंतर दिमाखदार पुतळा उभारणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय.

श्रीनगरमध्ये ड्रोन हल्ला, अमृतसरमध्ये रेड अलर्ट, कच्छमध्ये ब्लॅकआउट… पाकिस्तानने युद्धबंदी तोडल्यानंतर काय-काय घडले?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब असून त्याच तेजाने आणि स्वाभिमाने हा पुतळा उभा झालाय. मालवण किल्ल्यावर दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी वेळेत पुन्हा हा पुतळा प्रस्थापित करू शकलो. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. शिवेंद्रराजे भोसले आणि रविंद्र चव्हाण यांचा काळात काम वेगाने झालं. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

पाकिस्तान सुधारणार नाहीच! युद्धबंदीनंतर तीन तासांतच ड्रोन हल्ले; श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट

मालवणमधीळ शिवरायांचा कोसळलेल्या पुतळ्यामध्ये लोखंडाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे त्याला 3 ते 4 महिन्यांत जंग लागला होता. आत्ता उभारण्यात आलेल्या पुतळ्यामध्ये ब्रॉन्झ, झिंकसारख्या धातूचा वापर केला आहे. चक्रवादळातही पुतळा टिकणार असं नियोजन केलं असल्याचा दावा अनिलसुतार यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.

India-Pak War : विश्वयुद्ध ते भारत-पाक तणाव…; करोडोंंचा जीव वाचवणाऱ्या सायरनचा इतिहास काय?

दरम्यान, मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंतर राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले.

follow us