Download App

पुसद बाजार समितीवर माजी मंत्री मनोहरराव नाईकांचे वर्चस्व; पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी

  • Written By: Last Updated:

Manoharrao Naik dominated the Pusad Bazar Committee : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकी (Election of Market Committees) साठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता काही बाजार समिती निवडणुकींचे निकालही समोर येऊ लागले. राज्यातील महागाव, दिग्रस, बीड व यासंह अनेक बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. यवतमाळमधील पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Pusat Agricultural Produce Market Committee) निकाल देखील समोर आला आहे.

पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री मनोहरराव नाईक (Manohar Rao Naik) आणि आमदार इंद्रनिल नाईक यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मनोहरराव नाईक पॅनलचे 18 जागांपैकी 18 उमदेवार निवडून आले आहेत.

या निवडणुकीसाठी आमदार इंद्रनिल नाईक यांच्या नेतृत्वामध्ये मोठं यश आलं आहे. माजी मंत्री मनोहर नाईक आणि आमदार इंद्रनिल नाईक यांनी पुसद तालुक्यातील सर्व सोसायची व ग्रामपंचायत, व्यापारी हमाल गटाला योग्य मार्गदर्शन करत सर्व जागांवर उमेदवार भरघोस मतांनी निवडणून आणण्यात त्यांना यश आलं आहे.

अवकाळी पावसाचं संकट 2 मे पर्यंत कायम, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

दरम्यान, पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. यात मविआचे 18 जागांपैकी 18 उमेदवार निवडून आल्यानं पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर नाईकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या निकालामुळे नाईकांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजप-शिवसेनेला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही. त्यामुळं भाजपचे आमदार निलय नाईकांना मोठा धक्का बसला आहे.

Tags

follow us