Download App

पंचवीस जागा लढविणार; सर्वाधिक मतदारसंघ मराठवाड्यातील; जरांगेंची मोठी घोषणा

त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे.

  • Written By: Last Updated:

संतोष पाटील, जालना प्रतिनिधी

Manoj Jarange On Assembly Election:विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढण्याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (
Manoj Jarange) यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केलीय. राज्यातील 25 मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहेत. त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे. सोमवारी सकाळी सात वाजता उमेदवारांचे नावे जाहीर केले जाईल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील बीड, केज, मंठा, परतूर, फुलंब्री, कन्नड, वसमत, हिंगोली, पाथरी, गंगाखेड, हादगाव, लोहा-कंधार, धाराशिव, कळबं, भूम-परांडा या मतदारसंघात उमेदवार दिले जाणार आहेत. तर पुण्यातील दौंड, पर्वती मतदारसंघात उमेदवार दिला जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव, कोपरगाव, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि नांदगाव मतदारसंघातून उमेदवार दिले जाणार आहेत. यातील काही मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे. यातील काही मतदारसंघाचा निर्णय अजून घ्यायचा असल्याचे जरांगे यांनी सांगितले.


Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण होणार लखपती, मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान, म्हणाले, ‘आता दर महिन्याला…’

जरांगे म्हणाले, सकाळपासून 25 मतदारसंघावर चर्चा झाली आहे. त्यात काही मतदारसंघ वाढू शकतात. सोमवारी सकाळी सातवाजेपर्यंत उमेदवार आणि मतदारसंघ निश्चित केले जाणार आहे. मी दिलेल्या उमेदवाराला त्रास दिल्यास, त्यांचे जिल्ह्यातील दुसरे उमेदवार पाडू, त्रास देणाऱ्यांना आधी संपविणार असा इशारा
जरांगे यांनी दिलाय.

बाकी सगळ्यांना क्लिन बोल्ड, डिपॉझिट गुल करायचंय ; मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंसह मविआवर बरसले !

ज्या मतदारसंघात नावे नाही, त्या मतदारसंघातून नावे मागे घ्या, उमेदवार देण्यासाठी हट्ट धरू नका. मतदारसंघ वाढवून उपयोग नाही, शक्ती असेल तिथेच उमेदवार देणार आहे. बाहेर गेलेल्या मराठा समाजाने सुट्ट्या टाकून मतदारसंघात येऊन मतदान करायचे आहे. माझ्यासारखे तळमळ कोणी करत नाही, असे आवाहन जरांगे यांनी केले.

follow us