Download App

फडणवीसांनीच आरक्षण रोखले, आता पश्चातापाची वेळ, तरीही…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

मी कोणतेही आढेवेढे घेत नाही. राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखलं ते तुम्ही द्या ना? - मनोज जरांगे

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) कोणताही निर्णय घेत असतील आणि मी त्याला विरोध केला असेल तर पदाचा राजीनामा देईल, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. त्यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली. फडणवीसांवर पश्चाताप करण्याची वेळ आलीये, तरी ते सगेसोयरेचं आरक्षण का देत नाहीत? असा सवाल जरांगेंनी केला.

भारताला धक्का, मोहम्मद शमी बांगलादेश सिरीजमधून आऊट, ‘या’ दिवशी संघात परतणार 

फडणवीसांनीच आरक्षण रोखले
मनोज जरांगेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाचे आरक्षण रोखले आहे, हे नाकारता येणार नाही. अन्यथा सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. तुम्ही आमचे विरोधक नाही. माझी तुम्हाला सरळ विनंती आहे. मी कोणतेही आढेवेढे घेत नाही. राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखलं ते तुम्ही द्या ना? असं जरांगे म्हणाले.

एक लाखाहून अधिक खोटे गुन्हे नोंदवले
फडणवीस यांनी मराठा समाजातील मुलांवर एक लाखाहून अधिक खोटे गुन्हे दाखल केले. कालच माझ्यावरही तीन गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोपही जरांगेंनी केला. मुंबईला जात असताना गेवराईतून गेल्याने माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मग गेवराईतून जायचं नाही तर कुठून जायचं, असा सवाल जरांगेंनी केला.

मराठा-कुणबी एक असल्याचे किती पुरावे द्यायचे?
मराठा आरक्षण देण्यासाठी तुम्हाला हैदराबाद गॅझेट सापडत नाही म्हणता. सातारा संस्थांच्या नोंदी सापडत नाही म्हणता… बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट सापडत नाही म्हणता. मराठा आणि कुणबी एकच आहेत याचे पुरावे द्यायचे तरी किती?, असा सवाल जरांगेंनी केला भाजपमधील गोर गरिब लोकांनाही वाटतं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं. तुम्ही मराठ्यांचा द्वेष अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही, पण मी जर राजकारणात आलो तर तुम्हाला सीट निडणूक देणार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला.

भुजबळांना तुम्ही ताकद दिली
तुम्हाला हात जोडून सांगतो आता मराठ्यांचा द्वेष करणं सोडून द्या. मराठ्यांचं वाटोळ होईल, असं भुजबळ सांगतात. तुम्ही त्यांचं ऐकू नका. तुम्ही सर्वाच जास्त भुजबळांचे ऐकलं. भुजबळांना तुम्ही ताकद दिली. तुम्ही छगन भुजबळांना ओबीसी नेते गोळा करायला लावले. फडणवीस साहेब तुम्ही हे कसं नाकारता? असं जरांगे म्हणाले.

follow us