Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis Nagpur Violence : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीच्या वादावरून मोठी दंगल झाली. दोन गटांत तुफान राडा झाला. यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. याचा ठपका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठेवला आहे. निवडणुका तोंडावर ठेवून असे वाद निर्माण केले जातात, असा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलाय.
निवडणुका आल्यानंतर लगेच वाद उकरून काढला जातो. कबर इथे आणि दंगल नागपूरला? असा देखील सवाल जरांगे पाटलांनी केलाय. हे सगळे कावे असल्यामुळे समाजाने सावध राहणं गरजेचं आहे. यांचंच सरकार असून कबरीसाठी पैसे (Nagpur Violence) देखील हेच लोक देतात. ही दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
राज्यातील बसस्थानकांबाबत मोठा निर्णय, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या महत्वाच्या सूचना…
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी विचारलं की, यांना कोरटकर अन् सोलापूरकर दिसत नाही का? तिथं हिंदुत्व जागत नाही का? वेरूळमध्ये आज शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी मनोज जरांगे नागपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवर बोलत होते. आमच्या मताला इथं काय किंमत आहे, असा देखील सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय.
मोठी बातमी! विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध ; अपक्ष उमेश म्हात्रेंचा अर्ज बाद
निवडणूक तोंडावर आल्यानंतर असे वाद करतात. रक्षण देखील तुम्हीच करता. सरकारचे लोक कबर हटाव म्हणता आणि गोरगरिबांना अडचणीत आणतात. सरकार तुमचंच आहे, कबर काढायची असेल तर काढू शकता. परंतु गोरगरिबांना झुंजवू नका, अशी विनंती जरांगे पाटील यांनी केलीय. लोकांनी शांत राहून पोटापाण्याची काम करावी, दंगली करू नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.