Download App

धनंजय मुंडे 302 च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार…, संतोष देशमुख प्रकरणात जरांगे भडकले

Manoj Jarange Patil : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Murder Case) मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Murder Case) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. आज जालन्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) देखील 302 मध्ये येतात आणि नाही आले तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लक्ष काढण्यासाठी जुनी मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. असा दावा जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी केला. तसेच इतर प्रकरणातील आरोपी सापडतात पण कृष्णा आंधळे सापडत नाही ही मोठी शोकांतिका आहे. असं देखील यावेळी जरांगे म्हणाले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, जर एखाद्या प्रकरणात राजकारणी घुसले तर आमच्या सारख्या लोकांना प्रश्न सोडवता येत नाही. धनंजय मुंडे 302 मध्ये येतो, नाही आले तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येत आहे. सगळ्यांनी देशमुख प्रकरणाची वाट लावली आहे. असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, लाडकी बहिण प्रकरण मागे राहिले असून सरकार औरंगजेब, हलाल- झटका सारखे मुद्दे आणत आहे. असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

जबरदस्त! 230 किमी रेंज अन् भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 45 हजारांचा डिस्काउंट

तर हलाल – झटका प्रकरणात नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीका करत, ते फार विद्वान लोक आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर देशमुख प्रकरणाचे महत्व कमी करण्यासाठी यांनी तुमची आणि तुमची यांनी व्हिडीओ बाहेर काढण्याचे प्रकार सुरु आहे. असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जरांगे म्हणाले.

follow us