जबरदस्त! 230 किमी रेंज अन् भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 45 हजारांचा डिस्काउंट

MG Comet EV : भारतीय ऑटो बाजारात सध्या इलेक्ट्रिक कार्सची तुफान क्रेज पाहायला मिळत आहे. आज बाजारात एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स आणि दमदार रेंजसह इलेक्ट्रिक कार्स (Electric Cars) उपलब्ध आहे. यातच जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारात एक भन्नाट डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आला आहे.
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये 230 किमी धावणारी इलेक्ट्रिक कार MG Comet EV घरी आणू शकतात. या कारवर सध्या 45 हजारांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. ही कार बाजारात एक्झिक्युटिव्ह, एक्साईट, एक्सक्लुझिव्ह आणि 100-इयर एडिशन या चार व्हेरियंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MG Comet EV फीचर्स
या कारची लांबी 2974 मिमी, रुंदी 1505 मिमी आणि उंची 1640 मिमी आहे तर व्हीलबेस 2010 मिमी आहे. एमजी कॉमेट ईव्हीमध्ये कोल्ज फ्रंट ग्रिल, एलईडी स्ट्रिप, हेडलॅम्प आहे. यात मोठे दरवाजे, स्पोर्टी अलॉय व्हील्स आणि फ्लॅट रियर सेक्शन देण्यात आले आहे. याच बरोबर या कारमध्ये 10.25 इंचाची स्क्रीन, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल क्लस्टर आहे. एमजी कॉमेट ईव्ही बे (ब्लू), सेरेनिटी (ग्रीन), सनडाऊनर (ऑरेंज) आणि फ्लेक्स (लाल) या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
सतीश वाघ हत्या प्रकरण, हत्यापुर्वी जादूटोणा अन्…, दोषारोपपत्रात धक्कादायक माहिती
एमजी कॉमेट ईव्ही जीएसईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात 12-इंच व्हील्स आहेत आणि टायरचा आकार 145/70 आहे. तुम्हाला पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक मिळतात तर मागच्या बाजूला ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. कार खरेदी करण्यापूर्वी डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती डीलरकडून घ्यावी प्रत्येक शहरात डिस्काउंटची किंमत वेगळी असू शकते.