सतीश वाघ हत्या प्रकरण, हत्येपूर्वी जादूटोणा अन्…, दोषारोपपत्रात धक्कादायक माहिती

सतीश वाघ हत्या प्रकरण, हत्येपूर्वी जादूटोणा अन्…, दोषारोपपत्रात धक्कादायक माहिती

Satish Wagh Murder Case: पुण्यातील भाजपचे (BJP) आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांच्या हत्यानंतर (Satish Wagh Murder Case) संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती तर आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर (Akshay Jawalkar) आणि सतीश वाघ (Mohini Wagh) यांची पत्नी मोहिनी वाघ असल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे.

तसेच सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग देखील करण्यात आला असल्याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपींनी सतीश वाघ यांचा अपहरण करून त्यांच्यावर चाकूने 72 वार करून हत्या केली होती आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला होता. त्यानंतर सतीश यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलीस ठरण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आता या प्रकरणात गुन्हे शाखेने लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

अक्षय जावळक सतीश वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होता. या दरम्यान अक्षय आणि मोहिनी एकमेकांच्या संपर्कात आले. 2017 मध्ये सतीश यांना आपली पत्नी मोहिनी आणि अक्षय या दोघांबाबत संशय आला. तेव्हापासून अक्षय याने मोहिनीचे घर सोडले मात्र त्यानंतर देखील दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरूच होते. तसेच मोहिनी पती सतीश यांच्या त्रासाला वैतागली होती. त्यामुळे दोघांनी मिळून सतीश वाघ यांची हत्या केली.

Video : विधान परिषदेत प्रश्न लावण्यासाठी व्यवहार; भाजप आमदाराने फोडला ‘एजंट बॉम्ब’; सभागृहात खळबळ

अक्षय याने सतीश यांच्या खुनाची सुपारी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे या तिघांना दिली होती. त्यानुसार या तिघांनी वाघ यांची तब्बल तीन वेळा रेकी केली आणि त्यानंतर सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube