Sony-Honda ची इलेक्ट्रिक कार Afeela 1 EV अखेर लाँच, देणार 480km ची रेंज, जाणून घ्या फीचर्स
Afeela 1 EV : भारतीय बाजारासह जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात उत्तम फीचर्स आणि दमदार बॅटरी पावरसह नवीन इलेक्ट्रिक कार्स (Electric Car ) लाँच होत आहे. यातच आता कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2025 मध्ये Sony Honda Mobility ने आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीने Afeela 1 EV या नावाने इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये उत्तम फीचर्स आणि दमदार रेंज कंपनीकडून देण्यात आली आहे.
Afeela 1 EV आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून या कारमध्ये कंपनीने क्वालकॉम टेक्नॉलॉजीजच्या स्नॅपड्रॅगन डिजिटल चेसिसचा वापर केला आहे. ज्यामुळे कनेक्टेड कारचे फीचर्स आणखी स्मार्ट बनले आहेत.
Afeela 1 EV रेंज
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Afeela 1 EV एका चार्जमध्ये 300 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. Afeela 1 EV जागतिक बाजारपेठेत टेस्ला आणि रिव्हियन सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे.
Afeela 1 EV किंमत
Afeela 1 ची किंमत $89,900 (अंदाजे 77 लाख रुपये) पासून सुरू होत आहे. बाजारात ही कार ओरिजिन आणि सिग्नेचर या व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या कारच्या सिग्नेचर ट्रिममध्ये 21-इंच व्हील्स, रियर एंटरटेनमेंटसह सेंट्रल कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी फीचर्स देण्यात येणार आहे. Afeela 1 सिग्नेचर ट्रिमची किंमत $102,900 (सुमारे 88 लाख रुपये) आहे.
Japanese tech giant Sony announced its Afeela 1 is now available for preorder with a starting price of $89,900. The Afeela 1 is Sony’s first EV and was developed in partnership with Japanese automaker Honda pic.twitter.com/SUHBHmLPpf
— Reuters (@Reuters) January 7, 2025
याच बरोबर या कारमध्ये 3D मोशन मॅनेजमेंट सिस्टम देण्यात आले आहे. तसेच सोनीची 360 स्पेशिअल साउंड सिस्टीम देण्यात आली आहे, जी कारच्या केबिनमध्ये उत्तम आवाजाचा अनुभव देते.
ग्राहकांनो, ह्युंदाई देत आहे बंपर ऑफर, ‘ह्या’ कार्सवर 30 हजार रुपयांपर्यंत सूट
Afeela 1 EV सेफ्टी
Afeela 1 EV मध्ये 40 पेक्षा जास्त सेन्सर्स देण्यात आले आहे. ज्यात कॅमेरा, LiDAR, रडार आणि अल्ट्रासोनिक सेन्सर्स सारख्या फीचर्सचा समावेश आहे. हे सेन्सर एकत्रितपणे ADAS साठी आवश्यक माहिती देतात. ज्यामुळे सुरक्षित आणि स्मार्ट ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो.