Download App

राजीनामा देतानाही धनंजय मुंडेंनी मग्रुरी दाखवली : मनोज जरांगेंचा घणाघात

मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. राजीनामा देतानाही मुंडेंनी मग्रुरी दाखवली अशी टीका त्यांनी केली.

Manoj Jarange Criticized Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा (Dhananjay Munde Resignation) सुपूर्द केला. राजीनामा स्वीकारल्याचे फडणवीसांना जाहीरही केले. यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) टीकेची झोड उठवली आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. राजीनामा देतानाही मुंडेंनी मग्रुरी दाखवली अशी टीका त्यांनी केली.

आता सरकारवर नामु्ष्की ओढवली. मी या स्वरुपाचा असा राजीनामा देतो. तसं काही तो बोलत नाही. आताही तीच मग्रुरीची भाषा आहे. माझं दुखतंय मी राजीनामा देतोय, उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध? बरं झालं. अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना कळालं माजोरडा आहे म्हणून. महाराष्ट्रातील मराठ्यांनाही कळायला हवं होतं. मराठ्यांनी आता सावध राहून त्यांना मोठं करू नये. मराठ्यांनी हातचे राखून काम केले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Murder Case) हत्येचे फोटो समोर आले आहेत. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. खून करणाऱ्यांपेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट घडवून आणणारा धनंजय मुंडे आहे. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. फडणवीस साहेबांनी त्याला अटक केली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

जरांगे पुढे म्हणाले, एक असला गुंड पाळण्यापेक्षा त्याला जेलमध्ये टाकलं तरी काही फरक पडत नाही. राजकारणात खूप चांगले नेते आहेत त्यांना सांभाळा. मी आतापर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय कधीच काढला नाही. ते कितीही मंत्री झाले तरी आमचे काही करू शकत नाहीत. त्यांनी त्यांच्या मनाने अगदी आमदारकीपासून सगळ्या पदांचे राजीनामे दिले पाहिजेत.

अंजली दमानियांचा पुढचा प्लॅन ठरला; धनंजय मुंडेंचं मंत्रिपद घालवलंआता आमदारकीही घालवणार 

फडणवीस साहेब धनंजय मुंडेला सांभाळू नका. धनंजय मुंडेंनी सरकारचाच अजेंडा राबवला. आमचे अनेक लोकं फोडले. हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला. या प्रकरणातील आरोपींना भर चौकात घ्या आणि ह्यांना फाशी द्या. तरच अशी क्रूरता थांबेल. पण जर तुम्हाला राजकीय गुंड पाळायचे असतील तर त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील असा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

धनंजय मुंडेलाच पैसे पाहिजे होते. या प्रकरणात त्यांनी स्वतःच त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करुन घेतला पाहिजे. आमदारकी आणि मंत्रिपदाला लाथ मारायला पाहिजे. अजितदादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धनी होऊ नका. धनंजय मुंडेला बाहेर काढा आणि तुरुंगात टाका अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

follow us