Download App

Manoj Jarange : अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल

Manoj Jarange vs Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत उद्या संपणार आहे. आज बीड शहरात जरांगे पाटील यांची निर्णायक सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आणखी मुदत देण्याची विनंती केली. परंतु, मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आज त्यांनी बीडमधील सभेआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

Ajit Pawar : इथोनॉलवरील निर्णयानंतर अजितदादांचा शाहंना फोन; वेळ पडल्यास दिल्ली गाठणार

बीड शहरातील जाहीर सभेआधी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, आम्ही कायद्याच्या चौकटीबाहेरचं काहीच मागितलेलं नाही. राज्यात 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. याआधी ज्यांना आरक्षण दिलं गेलं त्यातील अनेक समाजांच्या नोंदी नाहीत. अनेक समाज मागास सिद्ध झालेले नाहीत. तरीदेखील त्यांना आरक्षण दिलं गेलं. मराठा समाजाकडे मात्र नोंदी आहेत. ते मागास असल्याचंही सिद्ध झालं आहे तरीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलटी आहे का? अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

काय म्हणाले होते अजित पवार ?

कुणी काही मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारला नियमात आणि कायद्याच्या चौकटीत बसेल त्याच गोष्टी कराव्या लागतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करून आरक्षण दिलं होतं. ते हायकोर्टात टिकलं पण पुढे ते सर्वोच्च न्यायालायत टिकलं नाही. आता तिसऱ्यांदा आरक्षण देताना टिकेल असं आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे विलंब लागत आहे.

Manoj Jarange : नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना..; जरांगेंचा स्पष्ट इशारा

राज्यातील 54 लाख नोंदी सापडल्या 

राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या हा अधिकृत आकडा आहे. फक्त सरकारलाच सांगणारे आहेत असं नाही आम्हालाही सांगणारे लोक आहेतच. त्यांच्यातल्याच काही जणांना वाटतंय की आंदोलन सुरू राहावं. मी त्यांना सांगितलं होतं की अधिवेशनाचा वेळ वाढवा पण तसं केलं नाही. आता मात्र नोटीसा धाडल्या जात आहेत. त्यांनी आधी एक प्रयोग करून पाहिला आहे. ओता दुसरा प्रयोग करू नये, असा इशारा जरांगे पाटील यांनी काल राज्य सरकारला दिला होता.

 

Tags

follow us