Manoj Jarange On Sambhaji Bhide : आगामी विधानसभेपूर्वी राज्यात आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहे तर दुसरीकडे ओबीसीमधून आरक्षण देऊ नये असं ओबीसी नेते म्हणत आहे. यातच आज (18 ऑगस्ट) शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? असं म्हटलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून आता संभाजी भिडे यांच्यावर टीका होत आहे.
तर दुसरीकडे आता संभाजी भिडे यांच्या या भूमिकेवर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लय बेस्ट. वाघ मागत नसतो, शिकार करून घेत असतो. त्यांना बोलून काही उपयोग नाही, त्यांना दोष देऊन सुद्धा उपयोग नाही. त्यांची चूक असल्याचे कारण ही नाही. जे भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आहेत. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठे दूर जातील आणि हे देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे असा ही आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला. ज्यांना ज्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला लावले आहे त्यांच्यापासून मराठा समाज दूर गेला आहे. भिडे गुरुजींसोबत देखील मराठ्यांची पोरं आहेत आणि ते आता लांब जातील. फडणवीस म्हणजे स्वतःला संपवायला लागला आणि त्यांचे नेतेही संपवत आहे. असेही माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले. तसेच भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि हा फडवणीस यांचा सहावा ते सातवा डाव आहे असा आरोप देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केला.
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
सांगलीत आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता?, सिहांनी जंगल सांभाळायचे असते.
नगर जिल्ह्यात अजित पवारांचा मास्टरस्टोक, रोहित पवारांची जागा धोक्यात?
मराठा जात ही देशाचा संसार चालविणारी आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्या दिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल, हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संभाजी भिडे म्हणाले.