Manoj Jarange On Devendra Fadnavis : फडणवीस तुम्ही जी फसवणूक केली त्याचा सर्वात मोठा फटका 2024 ला तुम्हांला बसणार असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. ते आज जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मोठा फटका बसणार असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळ यांचं का ऐकता मराठ्यांचं का ऐकत नाही?, तुम्ही कबूल करूनही मराठ्यांना नोकऱ्या का दिल्या नाही? मी मराठ्यांचं काम करत आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर एसआयटी नेमली आणि ज्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला होता त्यांना तुम्ही बढत्या का दिल्या? तुम्ही कोणत्या मस्तीत आहात? असा सवाल माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी विचारला. तसेच माझ्याविरोधात दरेकर,विखे,नारायण राणे,बोंडे हे नेते बोलायला का तयार केलेत, हे नेते मराठ्यांचं काय वाईट करणार आहे असेही यावेळी जरांगे म्हणाले.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आज भाजपमध्ये असणारे मराठे अस्वस्थ आहेत. तुमच्याकडून आज मराठा, मुस्लिम, दलित, बारा बलुतेदार, धनगर, बंजारा, आदिवासी सर्व लोक परेशान आहेत. तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार आहे असा इशारा देखील यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
तसेच तुम्ही उठ की सुट ईडीची धमकी देत आहेत. त्यामुळे तुमची सत्ता येणार नाही. लोक सर्वात शेवटी विचार करतील. फडणवीस यांना सरळ पाडून टाका. माझे आवाहन आहे. मला राजकारणात जायचे नाही. माझी फक्त मागणी कुणबी प्रमाणपत्र, आरक्षण आणि केसेस मागे घेण्याची आहे.
मोठी बातमी! CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची तब्येत बिघडली, एम्समध्ये दाखल
तुम्ही छगन भुजबळ यांचे ऐकून आमच्या पोरांवर अन्याय करू नका. आज फडणवीस साहेब, तुम्ही गोंधळ निर्माण करून ठेवला आहात. तुम्ही वेळ द्या म्हटल्यावर आम्ही वेळ दिला मात्र तुम्ही पाळला नाहीत. 28 ऑगस्ट पर्यंत आमची मागणी मान्य करा आणि मला हलक्यात घेवू नका असा इशारा देखील जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना दिला.