Download App

मुंडे-रोहित पवारांमध्ये वाकयुद्ध! पवारांनी ‘जबाबदारी कशी’ विचारताच मुंडेंनी थेट मतदारसंघच काढला…

Mansoon Assembly Session : राजकीय उलथापालथनंतर आता विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या चौथ्याच दिवशी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये घमासान झाल्याचं दिसून आलंय. अजित पवार गटाचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. कृषी खात्याच्या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा सुरु असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांच्या सवालाला शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

IND vs WI: नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने घेतला गोलंदाजीचा निर्णय, मुकेश कुमारचे कसोटीत पदार्पण

सत्ताधारी पक्षाचे आमदार किरण लहामटे यांनी विधानसभेत कृषी खात्याचा प्रस्ताव सादर केला. लहामटेंनी सादर केलेल्या प्रस्तावावर इतर सदस्यांनी आपली भूमिका मांडली. भूमिका मांडत असताना अनेकांनी समर्थन दाखवलं तर अनेकांनी विरोध दर्शवल्याचं दिसून आलं. याचदरम्यान जे आमदार बोलत असताना सुनिल भुसारा यांचं नाव घेत त्यांनी रोहितदादांनी कसं सोडलं माहिती नसल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.

थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, कोणत्या राजकीय नेत्यावर कोणती जबाबदारी येईल, याचा नेम सांगता येत नाही. त्याचवेळी विरोधी बाकावर बसलेल्या रोहित पवारांनी ‘जबाबदारी कशी’ आली असा सवाल उपस्थित करीत मुंडेंना डिवचलं. ‘आता कशी’ जशी तुम्हाला कर्जत-जामखेड मतदारसंघात मिळाली तशी, असं प्रत्युत्तर मुंडेंनी दिलं. त्यावर पुन्हा पवार यांनी पुन्हा सवाल करत म्हणाले, ती लोकशाही आपल्याला सोयीची असून लोकशाहीची व्याख्या कधीतरी आपल्याला एकट्याला भेटून सांगेन. ती सार्वजनिक सभागृहात सांगणे उचित नसल्याचं ते म्हणाले, त्याचवेळी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘भांडण लागलं’ असे वक्तव्य केलं. त्यावरुन आमचं भांडणं लागणार नाही, गोरंट्यालसाहेब. आमचं भांडण बघत बघत तुमचं कधी काय होईल सांगता येणार नाही, असा इशाराच पवारांनी दिल्याचं पाहायला मिळालं.

ठाकरे गटाचे आक्षेप फेटाळले, नीलम गोऱ्हेच उपसभापती राहणार, तालिका सभापतींचा निर्णय

अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारच्या नेत्यांना चांगलच धारेवर धरलं जात आहे. राज्यातील इतर अनेक मुद्यांवर सडेतोडपणे भाष्य करीत सरकारकडून उत्तर मागत आहेत. सत्ताधारी नेत्यांकडूनही विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला रोखठोक प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच कृषी खात्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा सुरु असताना अनेकांचं लक्ष याकडं लागून होतं. त्याचदरम्यान काही सदस्यांकडून काही सूचना सुचवण्यात आल्या तर काहींनी कडाडून विरोध, तर काहींकडून टीका करण्यात आल्या. यावेळी विरोध आणि टीका करणाऱ्यांवरही धनंजय मुंडे यांनी निशाणा लावत प्रत्युत्तर दिलंय. ‘स्वभाविकच आहे विरोधी बाकावर बसल्यानंतर अंगात येतचं’ असं मुंडेंनी स्पष्ट केलं.

त्याचवेळी काही विरोधकांनी अनुभव..अनुभव.. असा आवाज करीत विरोधी बाकावर बसल्यावर अंगात येतं अन् सत्ताधारी बाकावर काय अनुभव येतो? असे खोचक सवाल करीत कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा डिवचलं. त्यानंतर बोलताना मुंडेंनीही गोरंट्याल यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. ‘आम्ही ऐकायलाचं बसलोयं’ असं मुंडेंनी गोरंट्याला यांना उद्देशून म्हटलंय. तसेच गोरंट्याल साहेब, माय डियर फ्रेंड. आपण म्हणाल त्या ठिकाणी मी उत्तर देतो. ही तळमळ सभागृहातील प्रत्येक सदस्याची असून सर्व सदस्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट केली असल्याचंही मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलंय.

Tags

follow us