Download App

कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसीतूनच पण मराठा..,; बावनकुळेंचं मोठं विधान

Chandrashekhar Bawankule News : कुणबी नोंद असणाऱ्यांना ओबीसीतून आरक्षण पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी-मराठा समाजात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच आता चंद्रशेखर बावनकुळेंनीही ओबीसी समाजाच्या बाजूने भूमिका मांडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’, निवडणुकीचंही ‘प्लॅनिंग’; घुले पाटलांच्या मनात नक्की काय?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मराठा आणि ओबीसीमध्ये कोणताही संघर्ष नाही. तीन पिढ्यांपासून कुणबी नोंदी आहेत. त्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी सर्व्हे सुरू आहे. मराठा समाजाला टिकणार आरक्षणं सरकार देणार आहे. याबाबत जो गैरसमज निर्माण झालायं तो कुणबी समाजाबाबत आहे. कुणबीमधील व्यक्ती ओबीसीमध्ये येण्यास कोणाची हरकत नाही. तीन पिढ्यांपासून ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत. त्यांना ओबीसमध्ये घेण्यास कोणतीही अडचण नाही. पण मराठा समाजाला वेगळ आरक्षण दिलं पाहीजे. कुणबी नोंदी असणारा समाजच ओबीसीमध्ये येवू शकतो, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

तसेच सगेसोयरे शब्दाबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. यावर कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर त्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यानंतर आक्षेपाची सुनावणी होईल. एखादी बाब चुकत असल्यास दुरुस्त करण्याबाबत सरकारन मुभा दिलीयं. अधिसूचना अंतिम होण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी पार पडणार असल्याचंही बावनकुळेंनी सांगितलं आहे.

IND vs ENG : बीसीसीआयने वजनावरून हिणवलेला सर्फराज अखेर टीम इंडियात ! संघात दोन मोठे बदलही

मोदी यांनी देशासाठी काम केलं आहे. मोदींचे विकासकामे घेवून घरोघरी जाणार. भाजपा जे मताच कर्ज घेतलंय ते मताच कर्ज काम करून परत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ज्या ज्या विकासासाठी जनतेच लक्ष लागलं होते ती सर्व कामे मोदी सरकारने मार्गी लावली आहेत. मोदी यांच्या नेतृत्वात कामाची खूप मोठी शिदोरी आहे. पुन्हा एकदा मोदी यांच्या गॅरंटीवर जनता मतं देईल हे निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मी निवडणूक आयुक्त नाही. लोकसभा निवडणुकाबाबत मला माहिती नाही. 2019 च्या निवडणुकीच्या वेळकापत्रकाप्रमाणे यावर्षी लोकसभा निवडणुकीचे अजेंडा दिसतंय. तसेच राज्यातील 48 लोकसभा मतदार संघातील महायुतीची कार्यालये सुरू झाली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us