Download App

‘आधीच्या नेत्यांना मराठ्यांची मतं कळली, पण मन कळलं नाही’; CM शिंदेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

Cm Eknath Shinde On Maratha Reservation : आधीच्या नेत्यांना मत कळलं, पण मन कळलं नाही’, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला आहे. दरम्यान, विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारी मिटणार असल्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्हा नामांतराचा मुद्दा अधिवेशनात! शिंदे-फडणवीसांनी घोषणा केली पण पुढे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आत्तापर्यंत अनेक नेते, लोकप्रतिनिधी झाले पण त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यावेळी नेत्यांना दुर्देवाने मराठा समाजाचं मत कळलं पण मन कळलं नाही, अन्यथा मराठा समाजाला याआधीच न्याय मिळाला असता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Ankita Lokhande Birthday: अर्चना ते बिग बॉस अभिनेत्री अंकिता लोखंडेचा असा होता अनोखा प्रवास

तसेच हा विषय आता इतिहास जमा झाला आहे. राजकारणातील काही नेते म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही. आजही मराठा समाज मागासच आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सर्वांची भावना आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. आरक्षणासाठी आत्महत्या करणं हे दुर्देवी वेदनादायी आहे. मराठ्यांना टिकणार आरक्षण आमचं सरकार देणार. आरक्षण हा मराठा समाजाचा अधिकार दोन समाजात तेढ निर्माण होणं चांगलं नसल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाचं माझ्याकडे सोल्युशन पण चोरांसमोर मांडलं तर… आंबेडकरांनी सांगितली भीती

मुख्यमंत्री म्हणून मला सर्वच जाती एकसमान आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द आमचं सरकार पूर्ण करणार आहे. सर्वात आधी मराठा आरक्षणासाठी आण्णासाहेब पाटलांनी लढा दिला आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदानही दिलं आहे. त्यामुळे आण्णासाहेब पाटलांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नसल्याचा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन याआधीही अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केल्याचं दिसून आले आहेत. शरद पवारांमुळेचं मराठा समाजाचं आरक्षण गेलं असल्याची टीका फडणवीस यांनी नागपूरातील कार्यक्रमातून केली होती. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून फडणवीसांना सडेतोडपणे उत्तर देण्यात आलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज