एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; ठाकरे गटाने शिंदेंना खिंडीत पकडलं
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात (Shiv Sena MLA disqualified) मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारपासून नागपुरात सुरू झाली. आज दोन सत्रात सुनावणी झाली. पहिल्या सत्राच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Devdutt Kamat) यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष घेतली. यावेळी ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात आला. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) हटवण्याच्या ठरावावर 23 आमदारांच्या सह्या असल्याचा दावा वकील कामत यांनी केला.
दिल्लीतील राजकारण तापले, राहुल गांधींनी अचानक रद्द केला परदेश दौरा
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी सुरू असताना ठाकरे गटाच्या वकिलांनी एक अटेंडन्स शीट सादर केली. ही अटेंडन्स शीट 21 जून 2022 रोजी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची होती. या अटेंडन्स शीटवर शिंदे गटातील तब्बल 23 आमदारांच्या सह्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे, या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेना आमदारांनी स्वाक्षऱ्या करून अनुमोदन दिलं होतं. शिंदे गटातील 23 जणांच्या सह्या आहेत. अशा स्थितीत हे अटेंडन्स शीट शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते.
दुग्धविकास मंत्र्यांकडूनच राज्यातील दूध उत्पादकांची बदनामी, बाळासाहेब थोरातांचा विखेंवर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांच्या गटाने विधानसभा अध्यक्षांना प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, सुनील प्रभू यांनी 21 जून रोजी शिवसेना आमदारांच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला होता. या बैठकीला एकूण 23 आमदार उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांना समर्थन देत गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावाला उपस्थित आमदारांनी या अनुमोदन दिलं, या आमदारांच्या अटेंड्नस शीटवर सह्याही केल्या आहेत. त्यामुळं शिंदे गटाची अडचण होऊ शकते.
कोणत्या आमदारांचा समावेश?
या बैठकीला आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित होते.
दररम्यान, या सुनावणीत आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नसल्याचा दावा केला.