141 खासदारांचं निलंबन! शरद पवारांनी केंद्राला धरलं धारेवर; म्हणाले, ‘संसदरत्न..,’
Sharad Pawar Speak On Suspension of MP : संसदेत हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) झालेल्या घुसखोरीवरुन विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. हाच ठपका ठेवत लोकसभेच्या सभापतींनी विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाचं सत्र सुरु केलं आहे. आत्तापर्यंत 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासह सुप्रिया सुळेंचाही (Supriya Sule) समावेश आहे. खासदार निलंबन प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारला चांगलचं धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे.
Government Schemes : कुसुम सोलर पंप योजना आहे तरी काय? लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
शरद पवार म्हणाले, हिवाळी अधिवेशनादरम्यान, संसदेत घडलेला घुसखोरीचा प्रकार अतिशय गंभीर असून खासदारा बसतात त्याच ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर चुकीचं आहे. संसदेत शिरलेल्या घुसखोराचां नेमका हेतू काय होता? त्याची सविस्तर माहिती मिळण्यासाठीच खासदारांनी चर्चेची मागणी केली असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
मात्र, संसदेत खासदारांमध्ये चर्चा करण्याऐवजी विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये संसदरत्न सन्मान मिळालेल्या सुप्रिया सुळे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आम्ही संसदेत कधीच समोर येऊन गोंधळ घालत नाहीत. तरीही खासदारांचं निलंबन करणं म्हणजे सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
मोठी बातमी : निलंबित खासदारांची संख्या 141 वर; सुप्रिया सुळे अन् कोल्हेंसह आणखी 49 जणांवर कारवाई
दरम्यान, मागील चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. आजच्या कारवाईनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 झाली आहे.
आज कारवाई करण्यात आलेल्या खासदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर आणि कार्ती चिदंबरम, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा समावेश आहे. कामकाजात अडथळा आणल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी संसदेच्या अधिवेशनात चार जण घुसून सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना घडली होती. यातील दोन जणांनी संसदेच्या सभागृहात स्मोक कॅंडलद्वारे धुर सोडून गोंधळ घातला होता. या प्रकरणावरुन संसदेची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतरच लोकसभेच्या सभापतींकडून खासदारांवर निलंबनाच्या कारवाईचं सत्र करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.