IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारतात रचला इतिहास, मोडला 21 वर्षांचा विक्रम; दुसऱ्या कसोटीत भारताला 549 धावांचे लक्ष्य

IND vs SA :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटाच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने शानदार कामगिरी करत इतिहास रचला आहे.

  • Written By: Published:
IND Vs SA

IND vs SA :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटाच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने शानदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. गुवाहाटी येथे सुरु असणाऱ्या या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेने भारतासमोर 549 धावांचे लक्ष ठेवले आहे. भारतात भारताविरुद्ध कोणत्याही संघाने ठेवलेले हे सर्वोच्च लक्ष्य आहे. यापूर्वी भारतात ऑस्ट्रेलियाने 2004 मध्ये नागपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतासमोर 543 धावांचे लक्ष ठेवले होते. या सामन्यात भारताचा 342 धावांनी पराभव झाला होता. आज दक्षिण आफ्रिकेने 21 वर्षांचा विक्रम मोडत भारतात भारतासमोर 549 धावांचे लक्ष दिले आहे.

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी (IND vs SA) क्रिकेटमध्ये आज तिसरे सर्वोच्च लक्ष्य ठेवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक लक्ष्य ठेवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. 2006 मध्ये कराची येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 697 धावांचे लक्ष ठेवले होते तर 2002 मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 568 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

गुवाहाटी येथे सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने दुसरा डाव 260 धावांवर घोषित करत भारताला 549 धावांचे लक्ष्य दिले आहे. 549 धावांचे पाठलाग करताना भारताने 27 धावांवर दोन विकेट गमावल्या आहे. दुसऱ्या डावात आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने 180 चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार मारत 94 धावा केल्या. त्याने टोनी डी जिओर्गी (49) सोबत चौथ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली आणि वियान मुल्डर (नाबाद 35) सोबत पाचव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली.

Ranragini Silver Jubilee : महाराणी ताराराणींची गाथा सांगणारं रणरागिणीचा रौप्य महोत्सव संपन्न

अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 62 धावांत चार विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 288 धावांची आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिकेच्या 489 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात 201 धावांवर सर्वबाद झाला.

Rajan Patil Exclusive Interview : शरद पवारांची साथ का सोडली? राजन पाटील स्पष्टच म्हणाले

follow us