27 वर्षांचा दुष्काळ संपला…, दक्षिण आफ्रिका बनला WTC चॅम्पियन; पहा फोटो

- दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाला धक्का देत लॉर्ड्सच्या मैदानावर बाजी मारली. या सामन्यात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव करत 27 वर्षांनंतर पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली.
- आफ्रिकेने 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात शेवटचे आयसीसी जेतेपद जिंकले होते. यासह, दक्षिण आफ्रिका सर्वात मोठ्या अंतरानंतर ट्रॉफी जिंकणारा संघ बनला आहे.
- सलग 7 कसोटी जिंकून WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने एन्ट्री केली होती.
- दक्षिण आफ्रिकेच्या विजयात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि सलामीवीर एडेन मार्करामने महत्वाची भूमिका बजावली. रबाडाने सामन्यात 9 बळी घेतले आणि मार्करामने चौथ्या डावात 136 धावा केल्या.
- कर्णधार टेम्बा बावुमानेही हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजताना 66 धावा केल्या. याचबरोबर बावुमा आयसीसी जेतेपद जिंकणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनला.
- यापूर्वी, दिवंगत हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली, दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये विल्स आंतरराष्ट्रीय कपचे विजेतेपद जिंकले होते.
- पहिल्या डावात 212 धावांवर गारद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांत गुंडाळून आपली स्थिती मजबूत केली होती.
- रबाडाची शानदार गोलंदाजी सामन्यात 9 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर नेले .
- या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचे लक्ष्य दिले होते. आफ्रिकेने हा सामना पाच विकेट्सने जिंकला.