Download App

‘मराठा समाजाची दिशाभूल करु नका, आरक्षण द्यायचं असेल तर…’ जितेंद्र आव्हाडांचा सांगितला मार्ग

Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राज्य सरकार केवळ मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधायक आणायला सांगितले पाहिजे, जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण खरचं द्यायचे असेल तर त्यांनी केंद्र सरकारला विशेष अधिवेशनामध्ये 16% आरक्षणासंदर्भातील विधायक आणण्याचे म्हटले पाहिजे. परंतु राज्य सरकारकडून असं न करता केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सुविधा म्हणजे सरकारचे चालढकलीचे काम करत आहे. यांना कुणालाच आरक्षण द्यायचे नाही आहे. मंडळ आयोगाने कुणबी समाजाला आरक्षण दिले होते, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की केंद्र सरकारकडून इंडिया शब्द इतिहास जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इंडिया नावाने योजना करायला चालते पण तुम्हाला इंडिया शब्द चालत नाही. यावरूनच समजते की केंद्र सरकार किती छोट्या मनाचे आहे. इंडिया आघाडीला देशभरात मिळत असलेल्या मोठ्या समर्थनामुळे केंद्रातील भाजपच्या नेत्यांची पायाखालची जमीन हल्ली आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया शब्द हा इतिहास जमा करण्याचा विधायक विशेष अधिवेशनात आणणार असल्याचे म्हटलं जात आहे. पण जर मी भारत नावाने पार्टी बनवली तर काय करणार आहात तुम्ही. भारत हा कधी देश नव्हताच आणि इंडिया हा देश कधी नव्हताच जेव्हा बाबासाहेबानी संविधान दिले तेव्हा हा देश तयार झाला आणि इंडिया नाव देण्यात आले, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

देशाच्या सर्वोच्च इमारतीचे आणि संविधानाच्या मंदिराचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं, यावरून मनुवादी विचार दिसून येतात. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याकरिता आलेल्या त्या साधूंची नावे काय होती? हे नावे ऐकून प्राचीन युगात गेल्यासारखे वाटले होते. या संसद भवनाच्या उद्घाटना वेळी स्त्रियांबद्दल मनुस्मृती द्वेष दिसला आहे. मला हे मान्य नाही मला सर्वसमावेशक हिंदू धर्म आम्हाला मान्य आहे. पण सनातन हिंदू धर्म मान्य नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

देशातील मोदी सरकार ही एक कलमी कार्यक्रम राबवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय देखील मोदी सरकारने बदलले आहे. दिल्ली सरकारचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने अध्यादेश आणून काढून घेतला आहे. भाजपला सोयीचं असेल अशा प्रकारे केंद्रातील सत्तेचा वापर करण्यात येत आहे. भाजपकडून देशाच्या संविधानाचे पायामुळ करण्यात येत आहे, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आधी मराठा आता धनगर समाजानेही सरकारला कोंडीत पकडलं, आरक्षणासाठी चौंडीत बेमुदत….

एका खाजगी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांची बातमी लावली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या व्हिडिओची चौकशी होणार होती त्याचं काय? झालं आहे. जे त्यांनी दाखवले त्याला त्यांनी दुजोरा दिला नाही. अशी बातमी लावणे म्हणून संपादकावर गुन्हा दाखल होतो, हाच गुन्हा आहे. त्यांनी ही बातमी कुठून आणली आणि कशी आणली हा संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us