उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

  • Written By: Published:
उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrasekhar Bawankule : मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असतांना तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केल्यानं मराठा आरक्षण त्यांनी गमावले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) केला.

बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाकडे उद्धव ठाकरेंनी डोळेझाक केली. शरद पवारांनी दुर्लक्ष केले आणि आता दोघांनाही सरकारवर आरोप करण्याचा अधिकार नाही. सत्तेत असताना त्यांनी मराठा आरक्षण टिकवले नाही. आता त्यांचे बोलणे निरर्थक आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या सनातन हिंदु धर्म संपवण्याच्या भाषेवर बोलतांना आता ठाकरे गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला. स्टॅलिन हे इंडिया आघाडीचे नेते आहेत. त्या आघाडीत उद्धव ठाकरे आहेत. स्टॅलिन यांच्याबाबत ठाकरे यांनी अद्याप ब्र देखील उच्चारला नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी आता सर्वच विषय सोडले आहेत. सनातन धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबत ठाकरे आहेत, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यांना स्टॅलिन यांनी केलेली टिका मान्य आहे असे समजायचं का, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

Malini Rajurkar passed Away : संगीत विश्वावर शोककळा! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन

किर्तीकर खरे बोलले
शिवसेना नेते पक्ष सोडून जात असतांना उद्धव ठाकरे हे केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, असे गजानन कीर्तीकर खरे बोलले. एकनाथ शिंदे आणि अन्य नेते सोडून गेले तरच पक्षाची कमान आदित्य ठाकरेंच्या हाती देता येईल, असं त्यांना वाटत होतं. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असूनही शिवसैनिकांची कामे होत नव्हती, त्यांनी मातोश्रीवर प्रवेशही नव्हता.

भारत नाव सर्वांसाठी वंदनीय
भारत या नावाला १० हजार वर्षांचा इतिहास आहे. ‘इंडिया’ हे नाव इंग्रजांनी दिले. भारत नावाचा विरोध करणाऱ्यांना या देशात पाश्चिमात्य पार्श्वभूमीवर काम करायचे आहे. सर्व देशवासीयांना भारतीय हिंदू संस्कृतीसाठी काम करायचे आहे. भारत हा शब्द प्रत्येकाच्या मनात असून तो सर्वांना अभिमानास्पद व वंदनीय आहे, सर्वच ठिकाणी भारत हा शब्द यावा, असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube