Manoj Jarange Patil : तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा कडक इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांना दिलायं. दरम्यान, राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. यासंदर्भातील घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलीयं. आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर हल्लाबोल चढवलायं.
जनतेच्या भक्कम साथीमुळेच विकासकामांना वेग; आमदार तनपुरेंनी नागरिकांचे मानले आभार
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत, पण राज्यातील 15 जाती ओबीसीत गेल्या पण मराठ्यांचा समावेश झाला नाही. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकले आहेत, तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही हे मराठ्यांच्याच हाती असून तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, या शब्दांत मनोज जरांगे यांनी फडणवीसांना इशारा दिलायं.
“राज ठाकरेंमध्ये आम्ही बाळासाहेबांना पाहतो”, शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरेंना पुन्हा साद..
तसेच मराठ्यांना बाजूला ठेऊन हे सत्तेत येऊ शकत नाहीत. मत द्यायचं की नाही हे आमच्या हातात आहे. मराठ्यांनी 100 टक्के मतदान करावं. मराठ्यांनी आता मतदानात ताकद दाखवावी. मराठ्यांनी मतांचं योग्य टायमिंग साधावं. लोकसभेला ताकद दाखवली त्यापेक्षा दुप्पट विधानसभेला दाखवा, ही आपल्या प्रतिष्ठेची वेळ आहे, मनात आणि मतात परिवर्तन करावं लागणार असून सरकारने जाणूनबुजून मराठ्यांचा अपमान केला, जात मोठी करायची की आमदार हे मराठ्यांच्या हाती आहे, फडणवीसांनी मराठ्यांचा पुरेपुर कार्यक्रम लावला असल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळी केलायं.
दरम्यान, मागील एक वर्षांपासून मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा आमरण उपोषणे केली, मात्र, या उपोषणांदरम्यान जरांगे यांना सरकारच्या शिष्टमंडळाकडून आश्वासनेच देण्यात आली आहेत. अखेर मनोज जरांगे यांनी थेट मुंबईत रॅली काढली. मात्र जरांगे यांना रॅली मुंबईतील वाशीमध्येच थांबवावी लागली, सरकारने आश्वासित केल्यानंतर जरांगे यांनी रॅलीतून माघार घेतली. त्यानंतरही जरांगे यांनी उपोषणाचा पवित्रा हाती घेतला मात्र पुन्हा आश्वासनेच देण्यात येत होती.
अखेर विधानसभा निवडणुकीआधी सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला जड जाणार असल्याचंही मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आलं, मात्र, जरांगे यांच्या मागणीकडे एका अर्थाने सरकारने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जरांगेंकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मराठ्यांनी एकजूट दाखवावी असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय.