Manoj Jarange On Devendra Fadnavis : भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा काटा काढणार, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत, असा अजब दावा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलायं. दरम्यान, येत्या 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांसह मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलायं.
अजितदादांना तिसरी आघाडी करण्याचे दिल्लीवरून आदेश, त्यामुळेच सरकारविरोधात…; रोहित पवारांचा आरोप
मनोज जरांगे म्हणाले, भाजपमधील सर्वच नेते मिळून देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढणार आहेत, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत, याबाबत भाजपचे लोकं आपल्याजवळ येऊन बोलत असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे लोकं मला रात्री येऊन भेटतात, असाही दावा मनोज जरांगे यांनी केलायं. तर छगन भुजबळांपेक्षाही अधिक जातीयवाद हा फडणवीसांनी पसरवला, असल्याची सडकून टीका मनोज जरांगेंनी केली.
विनोद तावडेंचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव; शरद पवार गटाच्या नेत्याशी बंद दाराआड खलबत
रावसाहेब दानवेंना कडक इशारा
रावसाहेब दानवे यांना मी आधी दादा म्हणायचो, पण माझ्यावर पोलिस केस बाहेर काढल्या आहेत त्यामुळे आता दानवे यांनी माझ्या नादी लागू नये, मी बिघडलो तर सगळं साफ करुन टाकेन, तुम्हाला ग्रामपंचायत सदस्यसुद्धा होऊ देणार नाही, अन् मुलाला उभं उभं केलं तर पाडलंच समजा, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केलायं.
मनोज जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, 29 सप्टेंबरपर्यंत सरकार काय निर्णय घेते ते बघू, यांना आता आपण बघूच, यांना निवडणुकीमध्ये पण पाडू… त्यांचे 113 आमदार आपण निवडून येऊ देत नाहीत. पाडू म्हणजे पाडूच. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची, काय व्हायचं ते होई दे, असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला.
ते म्हणाले, सरकारकडे 29 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. एक वर्षात माझ्या समाजाचा तोटा झाला. आता आरक्षणासाठी एक कुटुंब गेलेतरी चालतं. आपल्या जातीचं कल्याण तरी होईल. लाखो कुटुंबे वाचतील. ही आरपारची लढाई लढायची. 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण होणार म्हणजे होणारच, मागे हटायचं नाही. मी महिनाभर महाराष्ट्रात फिरणार आहे. मी सर्व तालुक्यांमध्ये जाणार आहे. 29 सप्टेंबरला सगळा महाराष्ट्र एक होईल, असं जरांगे म्हणाले.