Download App

फडणवीस, मराठ्यांचे आमदार आमच्या अंगावर घालू नका; जरांगेंनी कडक शब्दांत सुनावलं!

फडणवीस, मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, अशा कडक शब्दांत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलंय. ते जालन्यात शांतता रॅलीदरम्यान बोलत होते.

Manoj Jarange Patil : फडणवीस, मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, अशा कडक शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnvis) यांना सुनावलंय. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलायं. अंतरवली सराटीत उपोषण सोडताना जरांगेंनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला. त्यानंतर जरांगे यांनी राज्यात शांतता रॅलीचं आयोजन करुन दौरा केला. जालन्यात आयोजित शांतता रॅलीतून ते बोलत होते.

अबब! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दोन आठवड्यात 44 लाख महिलांचे ऑनलाईन अर्ज

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आमदारांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आला आहात, पण मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, तुम्ही मराठा समाज आणि मराठा नेत्यांमध्ये भांडणे लावत आहात. तुम्ही मराठा-मराठांमध्ये मारामाऱ्या लावून मजा बघू नका, मराठे खवळले तर गय करणार नाहीत, या शब्दांत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलंय.

12 नक्षलवाद्यांचा खात्मा; गडचिरोली पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस, फडणवीसांची घोषणा

सगळेचं एका माळेचे मनी…
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पक्षाने पाठ फिरवली, शिवाय विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून राडे झाले, याविषयी विचारले असता जरांगे म्हणाले. आम्ही लहानपणापासून या आमदारांचा राडा पाहत आहोत. हे सगळे एकाच माळेचे मनी आहेत.

सरकारची आरक्षण राजकीय इच्छाशक्ती आहे, असं मी ऐकलं. पण विरोधक आले नाहीत, म्हणून तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही का?, तुम्हाला द्यायचंचं नाही, असा तर मला संशय यायला लागला आहे. सत्ताधारी असो की, विरोधक यांना कुणाचाच विचार करायचा नाही. ते एकाच माळेचे मनी आहे. विधीमंडळात हे जनतेचे, समाजाचे प्रश्न सोडवत नाहीत. हे फक्त राडेच करतात, अशी टीका जरांगेंनी केली.

follow us