Download App

मी माझे शब्द मागे घेतो! ‘लायकी’च्या विधानानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी…

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) राज्यभर दौरा करीत आहेत. दौऱ्यादरम्यान आयोजित जाहीर सभेत सरकारसह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत आहेत. अशातच जाहीर सभेत जनतेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी मराठा वगळत इतरांना लायकी नसल्याची उपमा दिल्याचा आरोप करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यावरुन मनोज जरांगे यांनी मी माझे शब्द मागे घेत असल्याचं म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.

तेलंगणात भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण, हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन

मनोज जरांगे म्हणाले, माझा म्हणायचा उद्देश तसा नव्हता, वेगळा होता. पण विनाकारण त्याला जातीकडं ओढण्याचा प्रयत्न करायला लागले. काहींनी त्या शब्दाचा विनाकारण गैरसमज केला तर काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाचा अर्थ वेगळा जोडून त्याला जातीय रंग देण्याकडं ओढलं, असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.

देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू, तर 7 जण गंभीर जखमी

तसेच मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही केलेला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, पण विनाकारण काहीजण त्याला जातीय रंग देत आहेत, परंतू आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय हटणार नाही, तरीही काही जणांचा जर गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो, या शब्दांत मनोज जरांगे यांनी आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

IIT Bombay मध्ये नोकरीची संधी, 42 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 2 लाखांहून अधिक पगार

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी दंड थोपटले आहेत. त्यासाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत अनेक उपोषणे केली आहेत. अखेरच्या उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे कुणबी नोदींचा शोध घेण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती गठीत करण्यात आलीयं.

शिंदे समितीला आजतागायत 30 लाख पुरावे आढळून आले असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मराठा समाज हा कुणबीच असून या नोंदीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. दरम्यान,जाहीर सभांमध्ये बोलताना मनोज जरांगे संताप व्यक्त करताना आरक्षण नसल्याने लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचं विधान केलं.

जरांगे यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह बहुजन आणि मुस्लिम समाजातील महापुरुषांची नावे आणि त्यांचं कर्तृत्व वाचून दाखवत यांची लायकी नव्हती काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना करत जरांगे यांची कोंडी केली. त्यावरुन वादंग पेटताच अखेर मनोज जरांगेंनी ते शब्द मागे घेतले आहेत.

Tags

follow us