तेलंगणात भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण, हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन

तेलंगणात भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण, हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन

Telangana election 2023 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) शनिवारपासून तेलंगणाच्या निवडणुकीच्या (Telangana election) रणधुमाळीत उतरले. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचे (Hyderabad) नाव बदलून भाग्यनगर (Bhagyanagar) करणार आणि महबूबनगरचे नाव बदलून पलामुरू करण्यात येईल, अशी घोषणा रविवारी केली.

यानंतर तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी देखील पुन्हा एकदा नामकरणाचा पुनरुच्चार केला. जर पक्ष सत्तेवर आला तर हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ केले जाईल, असे अश्वासन दिले. दरम्यान महबूबनगरमधील एका निवडणूक रॅलीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, माफिया राजपासून लोकांना मुक्त करण्यासाठी आणि महबूबनगरला पलामुरू म्हणून पुन्हा स्थापित करण्यासाठी तेलंगणात आलो आहे.

कुमारम भीम आसिफाबाद येथील सभेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू. 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात दर दोन-तीन दिवसांनी दंगल व्हायची. माफियांचे समांतर सरकार होते, पण दुहेरी इंजिन असलेल्या भाजप सरकारने ही माफिया राजवट संपवली. उत्तर प्रदेशात गेल्या साडेसहा वर्षांत एकही दंगल झालेली नाही.

भावी शिक्षकांना केसरकरांची धमकी, ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमधील संवाद असा घडला…

रेड्डी म्हणाले, “तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास हैदराबादचे नाव बदलले जाईल. मी विचारले हैदर कोण आहे? हैदर नावाची गरज आहे का? हैदर कुठून आला? हैदरची गरज कोणाला? भाजप सत्तेवर आल्यास निश्चितपणे हैदर हे नाव काढून टाकले जाईल आणि शहराचे नाव बदलून भाग्यनगर केले जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही म्हटले आहे.

Rajasthan Elections : 0.74 टक्के मतदान ठरविणार राजस्थानचे राजकीय भविष्य? वाचा इनसाईड स्टोरी

रेड्डी म्हणाले की, मद्रासचे नाव बदलून चेन्नई, बॉम्बेचे मुंबई, कलकत्ता ते कोलकाता आणि राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ असे करण्यात आले आहे, तर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्यात काय हरकत आहे? केटीआरचा दावा आहे की भाजप जिंकणार नाही पण ते (केटीआर) आणि त्यांचे वडील (सीएम केसीआर) स्वतः निवडणूक हरणार आहेत.

यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.ते म्हणाले की “आधी त्यांना विचारा की हे ‘भाग्यनगर’ कुठून आले? ते कुठे लिहिले आहे ते त्यांना विचारा. तुम्ही हैदराबादचा द्वेष करता. नाव बदलणे हे त्या द्वेषाचे प्रतीक का आहे?” हैदराबाद ही आमची ओळख आहे, त्याचे नाव कसे बदलणार? ते केवळ द्वेषाचे राजकारण करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube