भावी शिक्षकांना केसरकरांची धमकी, ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमधील संवाद असा घडला…

भावी शिक्षकांना केसरकरांची धमकी, ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमधील संवाद असा घडला…

Deepak Kesarkar Viral Video : शिक्षक भरतीवरुन भावी शिक्षक आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आमनेसामने आलेत. भरतीच्या वेबसाईटबद्दल विचारल्यावर मंत्री केसरकर भडकले. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तु बेशिस्त वर्तण करतेस, माहिती घेऊन तुला अपात्र करतो अशी धमकीच केसरकरांनी सर्वासमोर दिली. बीड (BEED) जिल्ह्यातील कपीलधरा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या व्हिडिओत भावी शिक्षक मुलगी आणि केसरकर यांच्यातील संवाद पुढील प्रमाणे… ती मुलगी, प्रोसीजरची वाट बघून आम्ही खुप थकलोय. यावर केसरकर म्हणाले, तुम्हाला अजिबात कळत नाही का? शिक्षक तुम्ही होऊ शकता का? साईट ओपन झालेली आहे. यावर ती मुलगी म्हणते, साईट ओपन झालीय, रजिस्ट्रेशन केलंय पण पुढे प्रोसीजर चालत नाही. केसरकर म्हणाले, प्रोसीजर चालत नाही तर तुम्ही गेले पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे. ती मुलगी म्हणते, जाहीरातच आली नाही तर चॉईस कसा देणार? केसरकर म्हणाले, जाहीरात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहीरात द्यायला सांगितले आहे. यावर ती मुलगी म्हणते पण कधीपर्यंत येईल? तीच्या या प्रश्नावर केसरकर चिडले.

Supriya Sule : मंंत्र्यांना जरा आवरा, अन् जाहीर माफी मागा; भावी शिक्षकाला धमकी देणाऱ्या मंत्र्याला सुनावलं

ते म्हणाले, तुम्ही जर बेशिस्त असाल तर तुम्ही सरकारी नोकरी करु शकत नाही. यावर ती मुलगी म्हणाते, सर पाच वर्षापासून वाट बघतोय. भरती रखडली आहे. यावर केसरकर म्हणाले, तुम्हाला एवढं सहन होत नाही. तुम्ही मुलांना कसं शिकवणार? साईट ओपन झालेली आहे. मग तुम्ही मला कशाला आलात विचारायला? तुम्हाला माहितीय साईट ओपन झालेली आहे. भरती चालू आहे. एक लक्षात ठेवा श्रद्धा आणि सबुरी. यानंतर केसरकर माध्यामांशी बोलत होते. त्या मुलीने पुन्हा केसरकरांना प्रश्न विचारला. यावर केसरकर चिडले अन् म्हणाले की अजिबात मध्ये बोलायचे नाही. नाहीतर तुमचं नाव घेऊन मी ‘डिसक्वालिफाय’ करायला लावेल.

यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी केसरकरांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? असा सवाल केला आहे. त्या म्हणाल्या की महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो.

जाहीर व्यासपीठावर बोलण्यापेक्षा कॅबिनेटसमोर मागणी करा : सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सल्ला

त्या पुढे म्हणाल्या की एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube