Download App

बंद दाराआड कितीवेळा चर्चा? मनोज जरांगेंनी सगळंच क्लिअर केलं

Manoj Jarange Patiil : राज्य सरकारचं शिष्टमंडळ खुल्यामध्ये चर्चा करण्यास घाबरायचं, म्हणूनच चार भीतींच्या आत आमच्यात चर्चा झाली असल्याचं स्पष्टीकरण मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बंद दाराआड चर्चा केल्याने अनेक चर्चांना ऊधाण आलं होतं. त्यावर आज पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी सगळंच क्लिअर केलं आहे.

CBSE उडान योजना आहे तरी काय? कोणाला अन् कसा मिळणार फायदा?

मनोज जरांगे म्हणाले, मुंबईत जाण्याआधी लोणावळ्यात सरकारच्या शिष्टमंडळासोबत आमची चर्चा झाली होती. बाहेर चर्चा करण्यासाठी अधिकारी घाबरत असत. आंदोलनकर्ते घोषणाबाजी करायचे, त्यामुळे व्यथ्यय यायचा. त्यामुळे आम्ही चार भींतीच्या आत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. पदयात्रेदरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळासोबत तब्बल तीनवेळा बंद दाराआड चर्चा झाली होती. पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम होतो. जेवढ्या नोंदी सापडल्या आहेत, त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, यासोबतच सगेसोयऱ्यांनाही दाखले मिळावेत, या मागणीवर आम्ही ठाम असायचो, पण अनेकदा चर्चा फिस्कटायची, असं मनो जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Manoj Jarange : तो टर्निंग पॉईंट नाही तर आंदोलनावरील डाग; आंतरवालीतील लाठीचार्जवर जरांगे संतापले

नंतर नंतर अधिकारी घाबरायला लागले पोरांना. त्यामुळे बंद खोलीत चर्चा सुरु होती. आम्ही आमची सगेसोयऱ्याची व्याख्या त्यांना सांगितली. तसेच राज्यात 54 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्याच नोदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र सरकारने द्यावेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या नोंदीचा अहवाल सर्वच गावातील ग्रामपंचायतीत लावाव्यात, असंही ते म्हणाले आहेत.

बजेटआधीच मोदी सरकारचं गिफ्ट! स्मार्टफोन्स होणार स्वस्त; आयात शुल्कात मोठी कपात

छगन भुजबळांना थेट इशारा…
माझी त्यांना (छगन भुजबळ) पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अशी आव्हानं देऊ नये. कारण आम्हाला गोरगरिबांचं वाटोळं करायचं नाही. कोणाच्याही मुलांचं वाटोळं करून आम्हाला आमची पोरं मोठी करायची नाहीत. आम्हीसुद्धा पुराव्यांशिवाय बोलत नाही. मला असं वाटतं की, महाराष्ट्रातल्या ओबीसींनी भुजबळांना समजून सांगावं, तुमच्या राजकीय स्वर्थासाठी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करू नका. भुजबळांना ओबीसींची काळजी नाही. त्यांना केवळ त्यांचा राजकीय स्वार्थ महत्त्वाचा असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us