बजेटआधीच मोदी सरकारचं गिफ्ट! स्मार्टफोन्स होणार स्वस्त; आयात शुल्कात मोठी कपात

बजेटआधीच मोदी सरकारचं गिफ्ट! स्मार्टफोन्स होणार स्वस्त; आयात शुल्कात मोठी कपात

Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी केंद्र सरकारने मोठी घोषणा (Budget 2024) केली आहे. मोबाइल तयार करण्यासाठी ज्या स्पेअर पार्टसचा वापर केला जातो त्या वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्क (Import Duty) कमी करण्यात आले आहे. या वस्तूंच्या आयातीवर आता दहा टक्के शुल्क आकारण्याते येईल. याआधी 15 टक्के शुल्क घेतले जात होते. आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प उद्या (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) सादर करणार आहेत. मात्र, त्याआधीच आयात शुल्कात पाच टक्के कपात करून मोदी सरकारने मोबाइल उद्योगाला मोठं गिफ्ट दिलं आहे.

केंद्र सरकारने आयात शुल्क कपातीचा जो निर्णय घेतला आहे यामुळे मोबाइल मार्केटला मोठा फायदा होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच अशा चर्चा होत्या की केंद्र सरकार प्रीमियम फोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा अॅपल सारख्या मोबाइल कंपन्यांना होईल. फोनच्या निर्यातीत वाढ होईल.

Budget 2024 : ‘विरोधकांना पश्चातापाची संधी, आत्मपरिक्षण करा’ बजेटआधी PM मोदींकडून कानउघाडणी

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मोबाइल सेक्टर किमान 12 वस्तूंवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन तयार करण्याचा खर्च कमी होईल. चीन आणि व्हिएतनाम या देशांकडून मिळणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठीही हा निर्णय गरजेचा होता. याआधीच्या 2023-24 आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये मोबाइल फोनच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी काही वस्तूंवरील आयात शुल्क 2.5 टक्के कमी करण्यात आले होते.

सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार, सिम पॉकेट, मेटल पार्टस्, सेल्युलर मॉड्यूल आणि अन्य मॅकेनिकल पार्ट्सवर लागणारे आयात शुल्क पाच टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. या निर्णयानंतर भारतात कमी खर्चात फोन तयार होतील. त्यामुळे फोनच्या किंमतीही कमी होतील अशी शक्यता आहे. भारतात अॅपल आणि सॅमसंगक या ब्रँडेडे कंपन्यांचे फोन तयार होतात. आता सरकारने आयात शुल्क कपात केल्याने त्याचा फायदा या कंपन्यांनाही होणार आहे. फोन तयार करण्यासाठी महत्वाचे स्पेअर पार्ट कमी किंमतीत मिळणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून आगामी काळात कंपन्या फोनच्या किंमतीह कमी करतील.

Budget 2024 : गरीबांना अच्छे दिन! कर संकलनातून मिळालेला पैसा ‘या’ योजनांवर होणार खर्च

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज