Download App

‘गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला कडक इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarage) यांनी येत्या 20 जानेवारील मुंबईत धडक देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या 20 तारखेला मराठा बांधवांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यामुळे आता सरकारने आमच्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा कडक इशाराच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Mumbai News : शरद पवारांबाबत वादग्रस्त लिखाण; उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला वाटत नाही की, सरकार 20 तारखेपर्यंत आरक्षण देतील म्हणून आम्ही 20 तारखेला मुंबईत चाललो आहोत. याआधी चारवेळा सरकारने असंच केलं आहे. सरकारने जर जर 20 जानेवारीच्या आत आरक्षण दिलं तर आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आमच्या पोरांचे वाटूळ होईल म्हणून आम्हाला मुंबईत जायचं. मुंबईतल त्यांच्या लोकांनी हाणलं जरी गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…

तसेच मराठा आरक्षणामुळे मराठा बांधवांचं नूकसान होत आहे. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होत आहे. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. आता आरक्षणासाठी आम्हाला मुंबईत यावं लागणार आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी घरी बसू नका, लेकरांचे हाल करु नका, घराबाहेर पडा एकदाचं…आरक्षण लेकरांना द्या, 20 तारखेला सर्वांनी आंतरवलीपासून मुंबईला पायी निघायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. जरांगे म्हणाले, राज्य सरकार वेळ वाया घालवून मराठ्यांची फसवणूक केली. आम्हालाही मर्यादा आहेत. आमच्याकडून किती वेळ घेणार? आधी तीन महिने, नंतर चाळीस दिवस आणि आता दोन महिने घेतले. शेवटी आपल्याही काही मर्यादा आहेत. सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं आता 20 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार, असं जरांगे म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि इतरांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका न्यायालयाने मान्य केल्याने समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि बीआर गवई यांच्यासमोर २४ तारखेला सुनावणी होणार आहे.

follow us