Shambhuraj Desai On Chagan Bhujbal : कुणबीच्या नोंदीवर छगन भुजबळांची हरकत असेल तर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारावा, असा सल्लाच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujabal) दिला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीकडून कुणबी नोंदींचा शोध घेण्याची मोहिम सुरु आहे. आत्तापर्यंत अनेक पुरावे समितीला आढळून आले आहेत. त्यावर आक्षेप घेत छगन भुजबळांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर मंत्री शंभूराज देसाईंना भुजबळांना सल्ला दिला आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काय सांगितलं मला माहित नाही पण कुणबी नोंदींवर भुजबळांची काय हरकत असेल ते जिल्हाधिकाऱ्यांना सांगू शकतात, विचारु शकतात. उद्या राज्य मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत आम्ही यावर चर्चा करणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.
Neena Gupta:’महिलांना पुरुषांची गरज असते…’; वयाच्या 64 व्या वर्षी नीना गुप्ता यांचा खळबळजनक खुलासा
उद्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व गोष्टीची माहिती मिळणार आहेत. पूर्वी ज्यांच्या कुणबी नोंदी होत्या पण नंतर त्या मिळू शकल्या नाहीत, त्यांच्या नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात, गावात नंतर नोंदी केल्या जात असल्याची माहिती छगन भुजबळांकडे असेल तर ते मंत्री आहेत त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्री करावी, पण शिंदे समितीजी जी कार्यपद्धती आहे ती निश्चित केलेली आहे, त्याबाहेर कुठलीही महसूल यंत्रणा वेगळं काय करणार नाही. त्यानूसार काम करण्याचं काम सुरु असल्याचं शंभूराज देसाई यांनी ठणकावून सांगितलं आहे.
‘एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांचा जाच…’, आमदार लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
काय म्हणाले होते भुजबळ?
मराठा आरक्षणप्रकरणी राज्यात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचं काम आहे जुन्या नोंदी शोधणं, मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासह शाळेतील मुख्याध्यापकाकडून कुणबीच्या नोंदी लावल्या जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी अंबडच्या जाहीर सभेत केला होता. तसेच मराठवाड्यात काही लोक पूर्वीच्या नोंदीमध्ये खाडाखोड करून पेनाने कुणबी मराठा अशी नोंद करत आहेत. अशा खडाखोड केलेल्या लोकांना प्रमाणपत्र मिळत आहेत.