Maratha Reservation : …तर माझ्या आमदाराकीचा राजीनामा देईल; प्रसाद लाड यांनी ठणकावून सांगितलं

मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमदाराकीचा राजीनामा देणार असल्याचं आमदार प्रसाद लाड यांनी ठणकावून सांगितलंय.

Untitle (37)

Untitle (37)

Mla Prasad Lad-Manoj Jarange Meeting : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ठणकावून सांगितलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची अंतरवली सराटीत भेट घेतली. यावेळी जरांगे आणि लाड यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यासह विविध मागण्यांवर चर्चा सुरु आहे.

Cockroach Janta Party : राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही…अभिजितच्या आई वडिलांनी काय सांगितलं?

पुढे बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले, मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, मराठा समाजाचा प्रश्न तो आमचा प्रश्न मी देखील मराठा समाजाचा आहे. आजच्या भेटीत मनोज जरांगे यांच्या मागण्या, प्रश्न जाणून घेऊन मी ते सरकार दरबारी मांडणार आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, मागण्या पूर्ण न झाल्यास मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं आमदार लाड यांनी स्पष्ट केलंय. तसे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घेणं गरजेचं असल्याचंही लाड यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांचा तुकाराम मुंढेंवरील राग जाईना.. महत्त्वाचे पद दिल्याचा देखावा… प्रत्यक्षात डिमोशन

अनेकदा माझे मनोजदादांसोबत वाद झाले हे मान्य, पण आरक्षण मनोजदादांच्या आंदोलनामुळेच मिळालं आहे.एक भाऊ म्हणून मी दादांना विनंती करायला आलो आहे. तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मी प्रयत्न करेल. लोकं आपापसांत भांडणं लावण्याचं काम सुरु असून मला समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. दादांच्या सात आठ मागण्या, अडचणी समजून घेणार असून आज आमदार, नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून आलो. माझ्याविषयी काही द्वेष असेल तर ते दूर करायचे आहेत . एक लहान भाऊ म्हणून मी मनोज जरांगे यांच्याकडे विनंती करायला आलोयं. मला एक संधी द्यावी, आपल्यात एक वेळ ठरेल त्या वेळेत मी मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल असंही आमदार लाड यांनी स्पष्ट केलंय.

Exit mobile version