Cockroach Janta Party : राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही…अभिजितच्या आई वडिलांनी काय सांगितलं?
राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशी प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या आई-वडिलांनी दिलीयं.
Cockroach Janta Party : देशात सध्या कॉकरोज जनता पार्टीची (Cockroach Janta Party ) सर्वत्रच चर्चा सुरु आहे. काही दिवसांतच सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचे 18.7 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. अभिजित दीपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी दीपके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला असता अभिजितने राजकारणात जाऊ नये, सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याची प्रतिक्रिया अभिजीतच्या आई-वडिलांनी दिलीयं.
शंभूराज देसाई झेडपीतील मानहानीचा वचपा विधान परिषदेत काढणार ?
प्रसिद्धीमुळं भीती वाटते, दुसरं काही नाही. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची काय सवय नाही. आपल्या मुलाला अटक करतील का असं वाटते, असं अभिजीतची आई अनिता दीपके म्हणाल्या. अभिजीत दीपकेनं एका मीडियावर बोलताना म्हटलं की भारतात गेलं की तुरुंगात टाकतील असं अभिजित दीपकेच्या आई-वडिलांनी म्हटलंय. तसेच संजय राऊत, संजय सिंग यांना आत टाकलं होतं, कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं पण पेपर पाहून भीती वाटते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं भगवान दीपके यांनी सांगितलं.
तुमचं भविष्य उद्ध्वस्त केल्याने भाजपला अनफॉलो करा; कॉकरोच पार्टीचे संस्थापक भाजपवर भडकले
दरम्यान,छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आलायं.
तुमचं भविष्य उद्ध्वस्त केल्याने भाजपला अनफॉलो करा; कॉकरोच पार्टीचे संस्थापक भाजपवर भडकले
देशभरात चळवळीतून उभी राहिलेली मोहिमचे राजकीय पक्षामध्ये रुपांतर होईल का?, असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना माध्यमांकडून विचारण्यात आला होता. यावर नक्कीच होईल, पण मला आत्ता सांगण थोडं अवघड आहे, अशी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांनी दिली.