Rajendra Raut On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात घमासान सुरु आहे. बार्शीचे अपक्ष आमदार यांच्यात आणि मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. बार्शीच्या मराठा तरुणाला मारहाण झाल्याच्या मुद्द्यावरुन जरांगे पाटील यांनी नाव न घेता राजेंद्र राऊतांवर (Rajendra Raut) टीका केली. त्यानंतर आता राजेंद्र राऊतांनीही खरपूस समाचार घेतलायं. मला गोळ्या घालून माझी लेकरं रडवणार आहात का? असा थेट सवाल राऊतांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजेंद्र राऊत म्हणाले, मारहाण झाल्याचा प्रकार माझ्या माहितीत नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत, त्यांचं हे विधानस ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मनोज जरांगे पाटील मला गोळ्या घालून माझी लेकरं रडवणार आहेत का? त्यांनी महाविकास आघाडीकडून तशी सुपारी घेतलीयं का? प्रत्येकाला बघतो, मारतो, रडवतो, अशा धमक्या ते देत आहेत, राज्यात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलंय की नाही? असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
दिलीप सोपल यांच्या भेटीनंतर बार्शीत सभा..
ची सभा पार पडली. ही सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप सोपल यांची भेट घेतली. त्यानंतर सभा झाली. याच सभेनंतर बार्शीत पेटवा-पेटवीचं राजकारण सुरु झालं असल्याची शंका असल्याचं राजेंद्र राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना खुलं आव्हान दिलं होतं. ते म्हणाले होते, माजलगावच्या सभेत तुम्ही म्हणाला राजेंद्र राऊतच्या घरासमोर सभा घ्यायला जागा आहे का पाहा, तुम्ही जर कोणाला मॅनेज होणार नसाल, महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचं पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करणार असल्याचं राऊतांनी जाहीर केलं होतं.