Maratha Reservation : ‘सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल’; वडेट्टीवारांनी दिलं आव्हान

Maratha Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Reservation) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला […]

पंढरपुरात गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; 'उदात्तीकरण खपवून घेणार नाही'; वडेट्टीवारांचा इशारा

पंढरपुरात गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; 'उदात्तीकरण खपवून घेणार नाही'; वडेट्टीवारांचा इशारा

Maratha Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Reservation) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री खोटं बोलण्यात वस्ताद, सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा घणाघात !

जालन्यात लाठीमाराचे आदेश देणारा कोण? असा सवाल करत सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे सत्य समोर येईल, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. वडेट्टीवार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाठीमाराच्या घटनेवर (Maratha Reservation) संताप व्यक्त केला. शिंदे-फडणवीस सरकारवर कठोर शब्दांत प्रहार केले. जालन्यात पोलिसांनी केलेली लाठीमाराची (Jalna Maratha Protest) कारवाई कुणाच्या आदेशाने झाली? पोलीस अधीक्षक आणि डीवायएसपी मोकाट कसे? त्यांच्यावर अजून कारावई का झाली नाही? असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

आता मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) लवकरात लवकर तोडगा काढावा, त्याचबरोबर ओबीसीचं आरक्षण वाढवून द्यावं, आंदोलनस्थळी जाऊन मी हेच बोललो होतो. ओबीसी समाजाची जी भूमिका आहे तीच माझी देखील आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. लाठीमाराच्या घटनेवर गृहमंत्री फडणवीस यांनी माफी मागितली त्यामुळे मराठा समाजात आनंद आहे का, असा प्रश्न विचारला असता हे ते ठरवतील असे मोजके उत्तर वडेट्टीवार यांनी दिले.

Radhakrishna Vikhe : उद्धवजी, आता खुलासा कराच! ‘सनातन’च्या वक्तव्यावर विखेंचं आव्हान

तर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही – कडू

जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर चांगलच आहे. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची (Maratha Reservation) बदमाशी आहे. अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज कसा केला?, असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. आमच्याकडून जितके प्रयत्न करता येणे शक्य आहे तितके आम्ही नक्कीच करू. सरकारने आंदोलकांकडे आंदोलन म्हणून पहावे. पण, येथे येणाऱ्यांनी सेल्फीचं पडलं आहे. जरांगेंच्या आरोग्याचं काहीच पडलं नाही. वेळप्रसंगी मी देखील उपाशी राहण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

महाराष्ट्रात मराठा हा कुणबी आहे आणि हीच काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे सरकारने (Maratha Reservation) आता अंत पाहू नये. नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. सरकारने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नये, असेही कडू यांनी सुनावले.

Exit mobile version