मुख्यमंत्री खोटं बोलण्यात वस्ताद, सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा घणाघात !

मुख्यमंत्री खोटं बोलण्यात वस्ताद, सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा घणाघात !

Maratha Andolan : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील (Maratha Andolan) लाठीमाराच्या घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा सरकारला फटकार लगावली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मुख्यमंत्री हे खोटं बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळ्या चालविण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले ते सांगा, असा परखड सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठ्या गोळ्या चालवण्याचे (Maratha Andolan) आदेश द्यायचे आणि दुसऱ्या तोंडाने मला वेदनांची जाण आहे असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस-पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे, असा टोला सामनातून लगावला आहे.

Maratha Andolan : ‘आता अंत पाहू नका, नाहीतर..; कडूंचा सरकारला दम

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर (Maratha Andolan) होत चालला असतानाच जालन्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाचा भडका जास्तच वाढला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले व शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर सरकारने अमानुष लाठीमार केला, बंदुका चालवल्या. शिंदे-फडणवीस-अजित पवार सोडून सगळेच नेते जरांगे पाटलांच्या गावात जाऊन आले. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांन शासन करणार का?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

नागपूरच्या चाणक्यांचे जामनेरी चाणक्य गिरीश महाजन (Girish Mahajan) हे मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेले. मराठा आरक्षणासाठी (Maratha Andolan) सरकार काय काय करते आहे त्यांनी सांगितले. पण जरांगे पाटील यांनी खिशातून बंदुकीची गोळी काढून महाजनांच्या हाती दिली व सांगितले, तुमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी हे केले. आम्ही आरक्षण मागितले. सरकारने बंदुकीची गोळी दिली तसेच मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे जीआर हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणा नाही, असा दम जरांगे पाटलांनी भरला.

Letsupp Special : Maratha Reservation आंदोलनाचे नवीन हिरो मनोज जरांगे; पण त्यांच्या मागण्या मान्य करण्यात या आहेत अडचणी…

अजितदादांनाही दिला इशारा

दिल्ली विधानसभेवर ताबा मिळवण्यासाठी मोदी सरकारने (Maratha Andolan) जी धडपड केली तीच तत्परता मराठा आरक्षणासाठीही दाखवावी, असे आव्हान मुखपत्रातून देण्यात आले. मराठा समाजाने आता उपमुख्यमंत्री पवार यांनाही इशारा दिल्याचे नमूद केले आहे. फडणवीसांच्या सरकारमधून बाहेर पडा, नाहीतर परिणामांना सामोरे जा, हा इशारा पवारांना देण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube