Maratha Andolan : ‘आता अंत पाहू नका, नाहीतर..; कडूंचा सरकारला दम

Maratha Andolan : ‘आता अंत पाहू नका, नाहीतर..; कडूंचा सरकारला दम

Maratha Andolan : जालन्यात मराठा आंदोलकांवरील (Maratha Andolan) पोलिसांच्या लाठीमाराचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. विरोधक तर सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. इतकेच नाही तर आता सत्ताधारी गटातील नेतेही सरकारचे कान टोचू लागले आहेत. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी असल्याची संतप्त प्रतिक्रिया सत्ताधारी गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल (Maratha Andolan) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेवर माफी मागितली. यावरही कडू यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

Jalna Maratha Protest : मराठा आंदोलनात झालेली दगडफेक भिडेंच्या सांगण्यावरून? समन्वयकांचा आरोप

जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर चांगलच आहे. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची (Maratha Andolan) बदमाशी आहे. अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज कसा केला, असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. आमच्याकडून जितके प्रयत्न करता येणे शक्य आहे तितके आम्ही नक्कीच करू. सरकारने आंदोलकांकडे आंदोलन म्हणून पहावे. पण, येथे येणाऱ्यांनी सेल्फीचं पडलं आहे. जरांगेंच्या आरोग्याचं काहीच पडलं नाही. वेळप्रसंगी मी देखील उपाशी राहण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला.

महाराष्ट्रात मराठा हा कुणबी आहे आणि हीच काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे सरकारने (Maratha Andolan) आता अंत पाहू नये. नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. सरकारने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नये, असेही कडू यांनी सुनावले. दरम्यान, या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Letsupp Special : Maratha Reservation आंदोलनाचे नवीन हिरो मनोज जरांगे; पण त्यांच्या मागण्या मान्य करण्यात या आहेत अडचणी…

एक फुल, दोन हाफ आधी राजीनामा द्या – ठाकरे

जालन्यात घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी (Maratha Andolan) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पलटवार केला आहे. जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणी एक फुल अन् दोन हाप यांनी राजीनामा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. हे सरकार निर्घृणपणे काम करतंय, आंदोलकांना मी भेटलो आहे, त्यांच्यावर तुम्ही गोळीबार केला आहे. लाठीचार्जमध्ये शाळकरी मुलांनाही मारलं, लाठ्या आम्ही मारु का? एवढं साजूक तुम्ही वागता का? हे हास्यास्पद असून हे तीन तिघाडा काम बिघाडा सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube