Ambadas Danve on Chhagan Bhujbal :मुंबईः राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) जोरदार फटकारले आहे.
Sunil Tatkare : 2009 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
अंबादास दानवे म्हणाले, सरकारचे मुख्यमंत्री एक बोलत आहेत. तर सरकारचे मंत्री एक बोलत आहेत. त्यातून सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. सुस्पष्टपणा दिसत नाहीत. दोन बाजूला दोन तोंडे दिसत आहेत. सरकारचे तोंड दुसरीकडे आणि मंत्र्यांचे तोंडू दुसरीकडे दिसत आहे. मराठा समाजाला दुसऱ्यांचा वाटा घ्यायचा नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे. मराठा समाजातील तरुणांवर मोठा प्रमाणात अन्याय होत आहे. म्हणून मराठा समाजाविषयी सरकार काही गोष्टी सकारात्मक करत असेल तर त्या चांगल्या आहे. सरकारमधील मंत्री विरोध करत असतील तर, मराठा समाजाचा विचार करून एकत्र यावे लागणार आहे. पण मराठा समाजातील नेतृत्व हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहे हे लक्षात ठेवावे, असे दानवे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या गाडीला भीषण अपघात, शिक्षकाचा मृत्यू
मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यांना आरक्षण मिळविण्यासाठी सरकार काही पावले टाकत आहे, ते सकारात्मक आहे. आरक्षण मिळणे हा लांबचा पल्ला आहे. दोन्ही समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपसात भांडत बसायचे का ? हा प्रश्न आहे. जे नेते मंत्री मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत असलीत, समाजही त्यांच्याविरोधात भूमिका घेईल, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
भुजबळांनी केलेल्या बीड दौऱ्यावरूनही दानवे यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. आमदार प्रकाश सोळंके हे स्वतः मनोज जरांगे यांना भेटले आहेत. दोन्ही बाजूने काही गैसमज होते ते दूर झालेले आहेत. तेथे जाऊन छगन भुजबळांनी आगीत तेल ओतण्याची गरज नव्हती. छगन भुजबळ मराठा समाजाच्याविरोधात अजेंडा राबवत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. त्यावर मग सर्व समाजाला विचार करावा लागणार असल्याचा इशाराही दानवे यांनी दिला आहे.