Ritu Tawade : जैनमुनींनी दीर्घ ओमच्या उच्चाराचा व्यायाम करुन घेतला त्यामुळे माझा घसा बरा झाला असल्याचं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी दिलंय. काल महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर आज तावडे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं स्पष्टीकरण दिलंय.
महापौर तावडे म्हणाल्या, काल जैनमुनींनी कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबईच्या डबेवाल्यांसाठी ई-बाईक्स अन् दिव्यांगांसाठी बाईक्सचे वाटप करण्यात आले. मी महाराजांविषयीचा आदर व्यक्त केला. दीड वर्षांपासून मला घशाचा त्रास होता. औषधंही सुरु होते, मला होत असलेला त्रास जैन मुनींना सांगितला, त्यांनी मला ओमचा उच्चार करण्याचा व्यायाम सांगितला, मी रोजच ओमचा उच्चार करते, त्यामुळे माझा गळ्याचा त्रास गेला असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलंय.
पॅन कार्ड, बॅंकिंग अन् डिजिटल पेमेंट…सर्वसामान्यांचं गणित कोलमडणार? आजपासून नियमांत मोठा बदल!
यामध्ये अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं. आम्ही जैन मुनींना फॉलो करतो. काल झालेल्या कार्यक्रमानंतर मी घरीही नाही आले तर अशा बातम्या लावल्या गेल्या आहेत. या बातम्या पाहून अतिशय घाणेरडं वाटलं. या गोष्टीचं मला वाईट वाटतं असल्याचं रितू तावडेंनी स्पष्ट केलंय.
अमोल खताळांच्या अडचणीत वाढ, आमदारकी रद्द होणार? थोरातांची याचिका न्यायालयाने स्वीकारली
संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही…
या विधानावरुन होत असलेल्या चर्चेवरुन बोलताना तावडे म्हणाल्या, तुमच्या घरी आयाबहिणी आहेत की नाही? कशाला ट्रोल करता . उबाठाचे भोंगे त्यांच्या जीभेला हाडचं नाही. एका महिलेबाबत काय बोलता जेव्हा ईडी लागली तुमच्या बायकोवर आलं तेव्हा तुम्ही उफाळू आलात. महिलेबाबत असं स्टेटमेंट देता मला बोलतानाही लाज वाटते, या शब्दांत रितू तावडे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांचा निषेध केला आहे.
काय म्हणाल्या होत्या महापौर तावडे?
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. मी गुरुजींना सांगितले की आवाजाची समस्या आहे. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक परत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी आशीर्वाद दिला आज मी स्पष्ट बोलत आहे. हा मोठा चमत्कार असल्याचे वक्तव्य महापौर रितू तावडे यांनी केलं आहे. आज माझा आवाज तुम्ही ऐकत आहात. खूपच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे असे रितू तावडे म्हणाल्या.
